Ads

एम्ब्रॉयडरी अँड स्टीचिंग क्लस्टरच्या माध्यमातून कौशल्य विकासासह रोजगाराची संधी - आ. किशोर जोरगेवार.


चंद्रपुर :-आजचा युवक हा प्रतिभावं आहे. नवे शिकण्याची त्यांच्यात आवळ आहे. मात्र व्यासपीठ आणि योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे त्यांना आवड असलेल्या क्षेत्रात यश संपादित करण्यासाठी संघर्ष करावा लागतो मात्र आता एम्ब्रॉयडरी अँड स्टीचिंग क्लस्टरच्या माध्यमातून युवक युवतींना कौशल्य विकासासह रोजगाराची संधी उपलब्ध झाली असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
सर्च एम्ब्रॉयडरी अँड कांथा स्टीचिंग क्लस्टर फौंडेशनच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या एम्ब्रॉयडरी अँड स्टीचिंग क्लस्टरच्या इमारत बांधकाम व मशनरी प्रतिष्ठाचा उद्घाटन सोहळा काल शुक्रवारी पार पडला या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते . यावेळी खासदार बाळू धानोरकर, राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सुदर्शन निमकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विजय बावणे, धणोजी कुणबी समाजाचे अध्यक्ष पुरुषोत्तम सातपुते, अमोल गायकवाड, चंद्रकांत वासाडे, राजेश पेचे, विजय बदकल, दिलीप झाडे आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले की, रोजगार उपलब्धीसाठी औद्योगिक क्षेत्राची गरज आहे. मात्र औद्योगिकरन होत असताना साहजिकच प्रदूषणातही वाढ होणार आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रित ठेवत रोजगार निर्मिती करता येईल अशा उद्योगाकडे वळण्याची गरज आहे. एम्ब्रॉयडरी अँड स्टीचिंग क्लस्टर हा सुरू झालेला उद्योग याचेच एक उत्तम उदाहरण असून यातून हाजरो युवक युवतींच्या हाताला रोजगार मिळणार आहे. त्यामुळे अश्या उद्योगांना लोकप्रतिनिधी म्हणून शक्य ती सर्व मदत करण्याची आमची तयारी आहे. फक्त या उद्योगांनी रोजगार देत असतांना स्थानिकांना प्राधान्य दिले पाहीजे. आजचा हा उदघाटन सोहळा खर तर अनेक बेरोगारांसाठी रोजगाराची नवी संधी घेऊन आला असल्याचेही ते यावेळी म्हणाले, यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी येथील कामाची पाहणी करत माहिती घेतली. या कार्यक्रमाला येथील कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment