Ads

मोबाईल हिसकावणारे 2 आरोपी रामनगर पोलिसांच्या जाळ्यात सापडले

चंद्रपूर:-
"आमची गाडी बंद पडली आहे, मोबाईल देता का? एक कॉल करायचा आहे" असे म्हणत मोबाईल हिसकावणारे 2 युवक रामनगर पोलिसांच्या जाळ्यात सापडले.

दि.24/02/2022 ला शहरातील रयतवारी कॉलरी परिसरात राहणाऱ्या 15 वर्षीय मुलाने फिर्याद दिली की  शाळेतून घरी येत असताना 2 युवक माझ्याजवळ येत मोबाईल मागायला लागले, मी विचारले असता त्यांनी आमची गाडी बंद पडली म्हणून एक कॉल लावायचा असे म्हणाले, मी मोबाईल दिला असता त्यांनी दुचाकीने पळ काढला. Mobile theft फिर्यादीचा Vivo20 आय कंपनीचा 8 हजार रुपये किमतीचा मोबाईल 2 युवकांनी पळविला, सदर फिर्याद रामनगर पोलिसांना प्राप्त होताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शोध पथकाचे सपोनि हर्षल एकरे यांनी तपासाची चक्रे फिरवली, सदर प्रकरणाबाबत गोपनीय माहिती प्राप्त झाल्यावर 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आले. दोघांची कसून चौकशी केल्यावर त्यांनी गुन्ह्याची

कबुली दिली. यामध्ये आरोपी नेरी उर्जानगर येथे राहणारा 21 वर्षीय साहिल राजू सरदार, दुर्गापूर येथे राहणारा 19 वर्षीय शुभम नानाजी कावरे यांचा समावेश आहे. दोन्ही आरोपी जवळून चोरी गेलेला vivo कंपनीचा मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण 58 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे सदर कारवाई 24 तासांच्या आत यशस्वीपणे पार पडली. Chandrapur जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश मुळे यांच्या नेतृत्वाखाली सपोनि हर्षल एकरे, पोउपनी विनोद भुरले, रजनीकांत पुठ्ठावार, पेतरस सिडाम, किशोर वैरागडे, आनंद खरात व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी कारवाई यशस्वीपणे पार पाडली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment