Ads

रामनगर पोलिसांची नॉयलॉन मांजाविक्री करणाऱ्यावर धडक कारवाई

चंद्रपूर :
महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या नॉयलॉन मांजाची विक्री करणाऱ्या इसमावर रामनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने कारवाई केली. या कारवाईत ₹२३,४००/- किमतीचा नॉयलॉन मांजा जप्त करण्यात आला असून संबंधित दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. crime news
Ramnagar police take strict action against those selling nylon manja
पोलीस ठाणे रामनगर येथील गुन्हे शोध पथक पेट्रोलिंग करीत असताना, गुप्त माहितीच्या आधारे रामनगर चौकातील नगिनाबाग रोडवरील फिशिंग पॉईंट या दुकानात नॉयलॉन मांजाची अवैध विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली. माहितीची खातरजमा करून पंचांसह छापा टाकण्यात आला.

छाप्यादरम्यान आरोपी गौरव हेमराज गोटेफोडे (वय २५, धंदा – जनरल स्टोअर, रा. रामनगर, नगिनाबाग रोड, चंद्रपूर) याच्या दुकानाची झडती घेतली असता काउंटरखालील बॉक्समध्ये प्रतिबंधित नॉयलॉन मांजाच्या चकऱ्या आढळून आल्या.

जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये मोनोकाईट फाईटर, मोनोफिल गोल्ड व हिरो प्लस या नावाने विक्री होणाऱ्या एकूण १६ चकऱ्यांचा समावेश असून त्यांची किंमत ₹२३,४००/- आहे.

नॉयलॉन मांजाचा साठा व विक्री केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ अंतर्गत कलम ५ व १५ तसेच भा.न्या.संहिता कलम २२३ अन्वये रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक आसीफराजा बी. शेख यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे अन्वेषन पथकातील सपोनि. नरोटे, वाघमारे, उगले व सोबत पोस्टॉप पो. हवा/१३०६ रामप्रसाद नैताम, पोहवा. आंनद ब.न. ११६५ पो.हवा शरद कुडे बन २२७३, पो.हवा. जितेंद्र आकरे ब.न.५६६, पो.हवा. लालु यादव ब.न. २४३०, मपोहवा मनिषा ब.नं. ४६२, पोशि संदिप ब.न. ८८१ पो.शी. पंकज ब.न १२३०, पोशि. सुरेश कोरवार ब.न.२२९१, पोशि रविकुमार ब.न. ८४७, पोशि प्रफुल्ल ब. नं.६३०, पोशि पंकज पोंद ब.नं. ७३४ व मपोशि ब्ल्युटी ब.न.२६५३, यानी केलेली आहे

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment