Ads

चावडी बैठकांच्या माध्यमातून राष्ट्रवादी कांग्रेस नागरिकांच्या समस्या सोडविणार

NCP will solve the problems of the citizens through Chawdi meetings

चंद्रपुर :-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रांताध्यक्ष मा.ना.श्री.जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून गावच्या चावडीवर/शहरातील मुख्य चौकात चावडी कार्यकर्ता बैठकांचे आयोजन करून,या बैठकांमध्ये त्या त्या गावातील/वार्ड मधील नागरिकांच्या समस्या ऐकून त्या सोडविण्याच्या दृष्टीने पक्षाच्या त्या गावातील/वॉर्डातील कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यायचा आहे.याच अनुषंगाने चंद्रपूर जवळील दुर्गापूर-उर्जानगर परिसरात आज चावडी बैठकीचे आयोजन श्री सुखराम तांडेकर,महिला तालुकाध्यक्षा सौ अनिता माऊलीकर यांनी केले होते,या बैठकीला जिल्हाध्यक्ष श्री.राजेंद्र वैद्य, महिला जिल्हाध्यक्षा सौ बेबीताई उईके,जिल्हा उपाध्यक्षश्री.सुधाकर कातकर,श्री.चंदू बघले, माजी उपसरपंच श्री.देविदास रामटेके,माजी ग्रा.स.श्री.किशोर आवळे, वार्ड अध्यक्ष सौ.प्रियंका मुन, सौ.रत्नमाला तांडेकर,संध्या अलोणे,सौ.शर्मा,इत्यादी उपस्थित होत्या.या बैठकीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, घरकुल,रेशन दुकानातून कमी धान्य मिळणे,नाली व रस्त्यांच्या समस्या अश्या विविध प्रश्नांवर नागरिकांनी आपापल्या तक्रारी मांडल्या,या प्रश्नांचा पाठपुरावा करून ते सोडविण्याची हमी जिल्हाध्यक्षांनी उपस्थितांना दिली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment