Ads

भद्रावती येथे खा. बाळु भाऊ धानोरकर यांच्या हस्ते ऑक्सिजन प्लाॅंटचे उद्घाटन

Eat at Bhadravati. Inauguration of Oxygen Plant by Balu Bhau Dhanorkar
भद्रावती,दि.५ (तालुका प्रतिनिधी):-
येथील ग्रामीण रुग्णालयातील नवनिर्मित ऑक्सिजन प्लाॅंटचे उद्घाटन खा. बाळुभाऊ धानोरकर यांच्या हस्ते शनिवारी पार पडले.
यावेळी आ. प्रतिभाताई धानोरकर, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष सिंग, न. प. उपाध्यक्ष संतोष आमने, नगरसेवक प्रफुल्ल चटकी, सुधीर सातपुते, नीलेश पाटील वकांग्रेस शहर अध्यक्ष सूरज गावंडे नगर परिषदेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
सदर ऑक्सिजन प्लाॅंटची निर्मिती माॅवेल कार्पोरेशन कंपनीद्वारे करण्यात आली असून अंदाजे ६८ लाख ३२ हजार रुपये एवढा खर्च करण्यात आला. दर मिनिटाला २५० मि.ली. प्राणवायू निर्माण करण्याची क्षमता या प्लाॅंटमध्ये आहे. रुग्णालयात असलेल्या एकूण ३० खाटाजवळ पाइपलाइनद्वारे या प्लाॅंटमधून ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी पाईप दिल्यामुळे सिलिंडर बदलविण्याचा प्रकार राहणार नाही. या प्लाॅंटला जनरेटर जोडला असल्याने विद्युत प्रवाह खंडित झाला तरीसुद्धा ऑक्सिजन पुरवठ्यात खोळंबा होणार नाही. या प्लाॅंटमुळे तालुक्यातील रुग्णांना ऑक्सिजन ची कमतरता भासणार नाही.
*अटल-आनंदवन वनप्रकल्पाचेही खासदारांच्या हस्ते लोकार्पण*
दरम्यान, विविध कामांच्या लोकार्पणांसोबतच खा. बाळुभाऊ धानोरकर यांच्या हस्ते येथील पिंडोनी स्मशानभूमीजवळील अटल-आनंदवन वनप्रकल्पाचेही लोकार्पण करण्यात आले. सदर वनप्रकल्प नगर परिषदेतर्फे उभारण्यात आला असून त्यात एक हजार मीटर क्षेत्रफळात ३० हजार वृक्ष लागवड करण्यात आली आहे. डॉ. अकिरा मियावाकी यांनी संशोधित केलेल्या जपानी पद्धतीने ही वृक्षलागवड करण्यात आली आहे. या पद्धतीमुळे कमी जागेत जास्तीत जास्त वृक्ष लावणे शक्य झाले आहे. या वनप्रकल्पात वृक्षांच्या एकूण ४८ प्रजाती लावण्यात आल्या असून त्यात वड, पिंपळ, निंबू, बेहडा, आंबा, सीताफळ आदी वृक्षांचा समावेश आहे.
सदर वनप्रकल्पाची निर्मिती १४ व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. या वनप्रकल्पामुळे शहराचे पर्यावरण समतोल राखण्यास व शहरातील प्राणवायूचे प्रमाण वाढण्यास मदत होणार आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment