Ads

लता मंगेशकर म्हणजे गायनाच्या इतिहासातीलएक सुवर्णपान: विजय वडेट्टीवार

चंद्रपूर :- दिवस-रात्र अशी कुठलीहीवेळ नाही किंवा क्षण नाही की लतादिदिंचा स्वर या जगात कुठून तरी कुठेतरी जात येत असतो. पण आता तो सूर लुप्त पावला. लता मंगेशकर यांची गाणी म्हणजे रसिकांसाठी मोठीपर्वणीच होती.
दिदी भारतीय चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायनाच्या इतिहासातील एक सुवर्णपान ठरल्या, असे भावनात्मक उद्गार राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काढले.
         लतादिदी कीती महान होत्या हे सांगतांना वडेट्टीवार यांनी सांगीतले की, लता मंगेशकर यांना १९६९ मध्ये तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार "पद्मभूषण". १९९९मध्ये द्वितीय सर्वोच्च नागरी पुरस्कार" पद्मविभूषण"ने सन्मानित करण्यात आले. २००१मध्ये त्यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल
"भारतरत्न" या सर्वोच नागरी पुरस्काराने सन्मानित केले होते. लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा
अंत झाला, एक महान पर्व संपले. त्यांच्या जाण्याने एक जागतिक प्रकारची पोकळी निर्माण झाली आहे.ती न भरून निघणारी आहे. भारतीय संस्कृतीच्या एक दिग्गज गायिका म्हणून येणाऱ्या पिढ्या त्यांना लक्षात ठेवतील. त्यांच्या सुरेल आवाजात लोकांना मंत्रमुग्ध करण्याची क्षमता होती. स्वरसम्राज्ञी
लतादिदी आज आपल्यातून गेल्या हे अत्यंत दुःखद आहे. पण त्या त्यांच्या अमृत स्वरांनी अजरामर आहेत. विश्व व्यापून राहिल्या आहेत. त्या अर्थाने त्या आपल्यातच राहतील. त्यांना त्यांच्या वडिलांकडून म्हणजेच पंडित दिनानाथ मंगेशकर यांच्याकडून गाण्याचा वारसा मिळाला होता. मीना खाडीलकर, आशा भोसले, उषा मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर या भावंडांमध्ये त्या सर्वात मोठ्या होत्या.
त्यामुळे मंगेशकर बहिण भावंडांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.

असंख्य रसिक श्रोत्यांचे भावविश्व समृद्ध करणारा स्वर्गीय सूर हरपला आ. सुधीर मुनगंटीवार

स्वरसम्राज्ञी गानकोकिळा भारतरत्न लतादीदी यांच्या निधनाने भारतीयांसह जगातील असंख्य रसिक श्रोत्यांचे भावविश्व समृद्ध करणारा स्वर्गीय सूर हरपल्याची शोकभावना माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.
Lata Mangeshkar लतादीदीनी गायन क्षेत्रात केलेला संघर्ष अनन्यसाधारण आहे. आपल्या स्वर्गीय स्वरांनी त्यांनी अवघ्या विश्वाला मोहिनी घातली. त्यांच्या निधनाची बातमी कानावर येताच मन सुन्न, निःशब्द झाले. त्यांच्या या दीर्घ गान प्रवासात त्यांचे सूर कधी अनेकांचे भावविश्व समृद्ध केले, ये मेरे वतन के लोगो अशी आर्त हाक भारतीयांना देत लतादीदीनी शहीदांच्या बलिदानाची गाथा मांडली. मेरी आवाज ही पहचान है असे म्हणणाऱ्या दीदी त्यांच्या असंख्य गीतातुन आमच्या सदैव स्मरणात राहतील असे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

अंगाई झाले, कधी तरुणाईचा आवाज झाला, अलवार प्रेमाचे प्रतीक झाला, या स्वर्गीय सुरांनी स्वरसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर जी यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखदायक आहे. जगभरात कोट्यावधी संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारे अलौकिक स्वर आज हरपले आहेत. स्वर्गीय आनंद देणारी लतादीदींची गाणी, त्यांचे देवी सूर हे आकाशात सूर्य-चंद्र असेपर्यंत राहतील, परंतु लतादीदी आपल्यात नसतील, ही कल्पना सहन होत नाही. लतादीदी जगात एकमेव होत्या. त्यांच्यासारखी गानकोकीळा पुन्हा होणे नाही... अशा लतादीदी आता पुन्हा होणे नाही..." त्यांचे कुटुंबीय आणि चाहते यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
बाळू धानोरकर, खासदार चंद्रपूर- आर्णी वणी लोकसभा क्षेत्र

संगीत व गायन क्षेत्रातील 'गानकोकिळा' लतादीदी यांनी आज आपल्या सर्वांचा निरोप घेतला. संगीत व गायन क्षेत्रातील दीदींनी गायलेली गाणी आजही सर्वांच्या सदैव स्मरणात राहतील.
नाम गुम जायेगा, चेहरा ये बदल जायेगा, मेरी आवाज़ ही, पहचान है गर याद रहे
लतादीदींच्या आवाजाचे स्वर आसमंतात कायम गुंजत राहतील. लतादीदींची जागा भविष्यात कोणी घेऊ शकणार नाही. इतका ठेवा त्यांनी देशाला दिलेला आहे. त्यांनी आयुष्यभर अविवाहित राहून
आपले संपूर्ण जीवनच देशाला समर्पित केले हा एक मोठा त्याग आहे. दीदींना भावपूर्ण श्रद्धांजली.
सौ प्रतिभा धानोरकर आमदार, भद्रावती वरोरा मतदार संघ

मेरी आवाज ही पहचान हे....!
गानसम्राज्ञी लता दीदी सदैव स्मरणात राहतील - आ. किशोर जोरगेवार

स्वर्गीय आवाजाच्या धनी, विश्वप्रसिध्द गायिका भारताच्या गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाने संपूर्ण भारतात शोककळा पसरली आहे. लता दीदीच्या जाण्याने एक अशी पोकळी निर्माण झाली आहे जी भरून निघणे कधीही शक्य नाही. गानसम्राज्ञी लता दीदी आपल्याला सोडून जाण हे फक्त शब्दातील आहे, वास्तविकतेमध्ये त्या आपल्या सुरेल गाण्यांच्या आठवणीने सगळ्यांच्या स्मरणात सदैव राहतील. अश्या भावना आ. किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केल्या आहे.
“मेरी आवाज ही पहचान हे...” “ज्योती कलश झलके..” “तुम आ गये हो...” या सारख्या अगणित सदाबहार लतादीदींनी गायलेली गाणे ऐकतच आमची पिढी मोठी झाली आहे. त्यांनी गायलेली भजने घरोघरी आज पण ऐकायला मिळते. त्यांचा स्वर्गीय आवाज रसिकांना मंत्रमुग्ध करणारा होता. “ऐ मेरे वतन के लोगों, जरा आंख में भर लो पानी...” या सारखे देशभक्तीपर गीते ऐकून तरुणांच्या नसानसात देशप्रेम जागृत होतो. त्यांना भेटीकरिता जाणार होतो, परंतु प्रकृती अस्वस्थामुळे भेट न झाल्याची खंत आ. किशोर जोरगेवारांनी व्यक्त केली. त्यांच्या अश्या जाण्याने भारताचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांची सुरेख गाणी ऐकून मोठी झालेली पिढी आणि त्यांच्या गाण्याचे रियाज करून संगीतविश्वात पदार्पण करणाऱ्यांच्या मनाच्या कोपऱ्यात त्या सदैव राहणार आहे. आज त्यांच्या सहवास जरी नसला तरी त्यांच्या स्मृति सुगंध देत राहील, त्यांचा रुपात देशाने एक गौरव हरवला आहे. अश्या शब्दात आ. किशोर जोरगेवार यांनी लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

ए मेरे वतन के लोगों जरा आंख में भरलो पानी

अश्या अमूल्य स्वरांने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या स्वरसम्राज्ञी गाणकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या जाण्याने देशातील संगीत क्षेत्र स्तब्ध झाले आहे.
आपल्या आवाजाने अनेक दशके गाजविणाऱ्या लतादीदी आपल्यामधून निघून गेल्या, यावर विश्वासच बसत नाही आहे. लतादीदिंचे स्वर अजरामर झाले असून त्यांची कमतरता संगीत व गायन क्षेत्रातील झालेली हानी भविष्यात कुणीही पूर्ण करू शकत नाही.

संदीप गिर्हे - जिल्हाप्रमुख, शिवसेना, चंद्रपूर
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment