गोंडपिपरी (जि. चंद्रपूर):-
अवैधरित्या देशी व विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या इसमाविरुद्ध गोंडपिपरी पोलिसांनी मोठी कारवाई करत १२ लाख ७६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई दिनांक १७ ऑक्टोबर २०२५ रोजी मध्यरात्री करण्यात आली.
Gondpipri police take drastic action - Illegal liquor trafficking worth Rs 12.76 lakh exposed
गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांना कळाले की, चंद्रपूर ते आष्टी या मार्गावर महिंद्रा स्कॉर्पिओ (क्रमांक MH30-AF-4656) या वाहनातून अवैध दारूची वाहतूक होत आहे. त्यानुसार गोंडपिपरी पोलिसांनी डांबर प्लँटजवळ नाकाबंदी केली. त्यावेळी संशयित वाहन दिसल्याने पोलिसांनी त्यास थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने पोलीसांना पाहून वाहन नाल्यावरून कापसाच्या शेतात पलटवले आणि अंधाराचा फायदा घेत पळून गेला.
यानंतर वाहनाची पंचासमक्ष पाहणी केली असता, त्यामध्ये देशी दारू संत्रा ९० एम.एल.च्या ५१ पेट्या (किंमत ₹२,०४,०००) आणि रॉयल स्टॅग १८० एम.एल.च्या ५ पेट्या (किंमत ₹६२,४००) असा एकूण ₹२,६६,४०० किमतीचा दारूचा साठा आढळून आला. तसेच वाहतुकीसाठी वापरलेली स्कॉर्पिओ कार (किंमत ₹१०,००,०००)** आणि सॅमसंग मोबाईल फोन असा एकूण ₹१२,७६,४०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जप्त केलेल्या दारूचा साठा तपासला असता सदर दारू डुप्लीकेट असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी संबंधित वाहनचालक व इतरांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास गोंडपिपरी पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सत्यजित आमले यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. रमेश हत्तीगोटे, पोलीस अंमलदार वंदीराम पाल, अतुल तोडास, रुपती गोडसेलवार, प्रशांत नैताम व गोंडपिपरी पोलीस ठाण्याचे पथक यांनी केली.
📌 गोंडपिपरी पोलिसांच्या दक्षतेमुळे मोठ्या प्रमाणावर अवैध दारू तस्करीचा पर्दाफाश झाला आहे.
0 comments:
Post a Comment