Ads

गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई : विधीसंघर्षित बालकाच्या ताब्यातून १ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

चंद्रपूर :
शहरातील बिनबा गेट परिसरात संशयास्पदरीत्या फिरत असलेल्या अल्पवयीन चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ कारवाई करून पकडले. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना सोन्याच्या दोन अंगठ्या मिळाल्या असून, या अंगठ्या घुटकाळा वॉर्ड येथील एका घरफोडीतील असल्याचे उघड झाले आहे.
Crime Branch takes drastic action: Property worth Rs 1 lakh seized from the custody of a child in legal trouble
शुक्रवारी (१७ ऑक्टोबर) रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे पथक चंद्रपूर शहरात गस्त घालत असताना गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली की, बिनबा गेट शांतीधाम परिसरात एक इसम संशयास्पदरीत्या फिरत आहे. तत्काळ कारवाई करत पथकाने त्या इसमास ताब्यात घेतले असता तो विधीसंघर्षित बालक असल्याचे समोर आले.

पंचासमक्ष अंगझडती घेतल्यावर त्याच्याकडून सोन्याच्या दोन अंगठ्या (अंदाजे किंमत ₹१ लाख) मिळून आल्या. विचारपूस केली असता त्याने घुटकाळा वॉर्ड परिसरात घरफोडी केल्याची कबुली दिली.

सदर मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करून पुढील तपासासाठी बालक व जप्त सोन्याचा माल पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे हस्तांतरित करण्यात आला आहे.

🔹 उघडकीस आलेला गुन्हा:
पो. स्टे. चंद्रपूर शहर
गु. र. क्र. 754/2025
कलम 305(a), 331(3), 331(4) भारतीय न्याय संहिता 2023

🔹 जप्त मुद्देमाल:
सोन्याच्या दोन अंगठ्या — एकूण किंमत ₹१,००,०००/-

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर अंतर्गत उपविभाग चिमूर पथकाने केली असून, त्यांच्या तत्परतेमुळे आणखी काही घरफोडी प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment