*📍जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद निवडणुकांसाठी काँग्रेस सज्ज : जिल्हा निवड मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.*
चंद्रपूर :-- चंद्रपूर जिल्ह्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने व्यापक पूर्वतयारीला सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांची चर्चा तसेच महाविकास आघाडी व मित्रपक्षांसोबत युती करून निवडणुका लढविण्याबाबत सविस्तर चर्चेसाठी जिल्हा निवड मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक आज पार पडली.
📍Congress ready for Zilla Parishad, Panchayat Samiti, Municipal Council elections: Important meeting of District Selection Board concluded.
या बैठकीला विधिमंडळ कॉंग्रेस पक्ष नेते माजी मंत्री आमदार विजयभाऊ वडेट्टीवार, खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे, चंद्रपूर विधानसभा प्रभारी मुजीब पठाण, चिमूर विधानसभा प्रभारी संजय दुबे, बल्लारपूर विधानसभा प्रभारी उमाकांत अग्निहोत्री, शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष रितेश तिवारी, प्रदेश सरचिटणीस माजी जि प अध्यक्ष तथा माजी अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संतोषसीह रावत, माजी जि प अध्यक्ष डॉ सतीश वरजुरकर, शिवाराव पोलशेट्टी, प्रदेश सचिव घनश्याम मूलचंदानी, डॉ ठाणेश्वर कायलकर, प्रेरणा गौर, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, सुभाष गौर, माजी प्रदेश प्रतिनिधी विनोद दत्तात्रेय, प्रवीण पडवेकर, प्रवीण काकडे, युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, युवक कॉंग्रेस शहर अध्यक्ष राजेश अडूर, महिला कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष सुनंदा ढोबे, NSUI जिल्हाध्यक्ष शपक शेख, कॉंग्रेस अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष प्रफुल खापर्डे, कॉंग्रेस ओबीसी विभाग अध्यक्ष प्रशांत दानव, कॉंग्रेस अणू. जमाती विभाग अध्यक्ष प्रमोद बोरीकर, अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष सोहेल रजा, सर्व ब्लॉक अध्यक्ष तसेच जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आदींसह काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्ष बळकट करण्याच्या रणनीतींवर, संघटनात्मक मजबुतीकरणावर तसेच स्थानिक प्रश्नांवर आधारित प्रचार आराखडा आखण्यावर भर देण्यात आला. संभाव्य उमेदवारांच्या निवडीसाठी विविध निकषांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत “जनतेशी नातं, विकासाशी बांधिलकी” या सूत्रावर काँग्रेस पक्षाने आगामी निवडणुकांचा ध्यास घेतल्याचे जिल्हा नेतृत्वाने स्पष्ट केले.
0 comments:
Post a Comment