Ads

अवघ्या ६ तासांत घरफोडी उघडकीस; आरोपींकडून २ लाख ९० हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त — स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

चंद्रपूर प्रतिनिधी : crime News
चंद्रपूर जिल्ह्यातील घरफोडी प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने केवळ सहा तासांत चोरी उघडकीस आणत दोन आरोपींना ताब्यात घेतले असून २,९०,३५०/- रुपयांचा सोन्या-चांदीचा व नगदी मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Burglary uncovered in just 6 hours; Property worth Rs 2 lakh 90 thousand 350 seized from accused — Local Crime Branch takes drastic action
पोलीस अधीक्षक मा. श्री. मुमक्का सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक मा. ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर पोलीसांकडून चोरी, घरफोडी व अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबविली जात आहे.

दिनांक २० ऑक्टोबर २०२५ रोजी पोलीस ठाणे चंद्रपूर शहर येथे गु.क्र. ७५७/२०२५ अन्वये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी मंगेश प्रमोद रामटेके (वय २७, रा. घुटकाळा वार्ड, चंद्रपूर) हे आपल्या कुटुंबासह बाहेर गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोरी केली होती.

या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कार्यरत असताना, गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून मौजा गडचांदूर येथील दोन संशयितांवर लक्ष ठेवण्यात आले.

पथकाने तत्परतेने कारवाई करत खालील दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले —
1️⃣ आरीफ कलंदर शेख (वय २८ वर्ष)
2️⃣ गौरव उर्फ गोलू प्रफुल बोझोकर (वय २० वर्ष) (दोन्ही रा. वार्ड क्र. ३, गडचांदूर, जि. चंद्रपूर) दोन्ही आरोपींकडून २,९०,३५०/- रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व नगदी असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी आरोपींना पोलीस ठाणे चंद्रपूर शहर यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली, पो.नि. अमोल काचोरे, पोउपनि. विनोद भुरले, पोउपनि. सुनिल गौरकार, पोहवा. सुभाष गोहोकार, पोहवा. रजनीकांत पुठ्ठावार, पोहवा. सतीश अवथरे, पोहवा. दिपक डोंगरे, पोहवा. इमरान खान, पो.अं. किशोर वाकाटे, हिरालाल गुप्ता व शशांक बदामवार (स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर) यांनी केली आहे.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment