जावेद शेख /भद्रावती : चंद्रपूर जिल्ह्यात दिवसेंदिवस तंबाखू, गुटखा, व विविध अमली पदार्थांचा बेकायदेशीर व्यापार वाढत असून, या विरोधात प्रशासन पूर्णपणे हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे. शासनाने बंदी घातली असली तरी स्थानिक पातळीवर पोलिस प्रशासन व संबंधित यंत्रणांच्या आशीर्वादाने हा धंदा जोमाने सुरू आहे, अशी माहिती समोर आली आहे.
Youth Sena's anger over illegal sale of drugs and tobacco
या गंभीर प्रकाराकडे लक्ष वेधण्यासाठी युवासेना महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य हर्षल भाऊ शिंदे व युवासेना चंद्रपूर जिल्हा प्रमुख आलेख भाऊ रट्टे यांचे मार्गदर्शनात, लोकसभा सचिव सुरज भाऊ शाहा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांना निवेदन सादर केले आहे.
या निवेदनात सुरज भाऊ शाहा यांनी म्हटले आहे की :-
> “जर प्रशासनाला जिल्ह्यातील तंबाखू व अमली पदार्थांच्या बेकायदेशीर विक्रीवर नियंत्रण ठेवणे शक्य नसल्यास, ही बंदी उठवून खुलेपणे विक्रीस परवानगी द्यावी. किमान जनतेला तरी हे सत्य कळेल की हे सर्व प्रशासनाच्या माहितीतच सुरू आहे.”
युवासेनेने प्रशासनाकडे तात्काळ विशेष मोहीम राबवून अशा बेकायदेशीर विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी लोकसभा सचिव सुरज भाऊ शाहा, युवासेना जिल्हा संघटक सुमित हस्तक, शिवसैनिक अभिजीत स्वान, युवासेना चंद्रपूर विधानसभा प्रमुख विशाल कवळे, भद्रावती उपतालुकाप्रमुख सिंगलदीप पेंदाम व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment