Ads

युवा प्रतिष्ठान ने जपली मानवता विकासाची बांधिलकी.

राजुरा १६ ऑक्टोबर :-
       मदतीचा हात जर वेदनेच्या क्षणी पुढे आला, तर तीच कृती देवत्वाचे स्वरूप धारण करते हाच मानवी संवेदनेचा आदर्श दाखवत युवा प्रतिष्ठान, कोरपणा यांनी पुन्हा एकदा समाजासमोर संवेदनशीलतेचा उत्तम आदर्श ठेवला आहे. सामाजिक व मानवता विकासाची बांधिलकी जपत युवा प्रतिष्ठान, कोरपणा तर्फे वार्ड क्रमांक १६ मधील रहिवासी अश्विनी मनोहर शिंदे हिला Wilson Disease (विल्सन रोग) या गंभीर व दुर्मिळ आजाराने ग्रस्त असल्याचे समजताच युवा प्रतिष्ठाने तात्काळ पुढाकार घेत तिच्या उपचारासाठी ₹२०,०००/- (वीस हजार रुपये) इतकी आर्थिक मदत दिली.The Youth Foundation has maintained its commitment to human development.
हा आजार अत्यंत खर्चिक असून, सतत औषधोपचार व वैद्यकीय देखरेखीची आवश्यकता असते. गरजू रुग्णांच्या मदतीसाठी युवा प्रतिष्ठान सदस्यांनी दाखवलेली संवेदनशीलता ही समाजासाठी प्रेरणादायी व आदर्श ठरत आहे.या प्रसंगी नितीन विजयराव बावणे, संस्थापक अध्यक्ष — युवा प्रतिष्ठान व नगरसेवक, नगरपरिषद कोरपणा यांनी सांगितले की,
“समाजातील प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत मदतीचा हात पोहोचवणे हेच आमचे कर्तव्य आहे. युवा प्रतिष्ठान नेहमी सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक कार्यात आघाडीवर राहील.” या मदतीच्या वेळी पंकज गिरसावळे, संकेत राऊत, दशरथ तोगरे, विशाल भोयर, शुभम इटणकर, नितेश चव्हाण, प्रदीप आदे तसेच युवा प्रतिष्ठान चे इतर सदस्य उपस्थित होते. युवा प्रतिष्ठान कोरपणा, समाजातील गरजू रुग्ण, विद्यार्थी आणि नागरिकांच्या सहाय्यासाठी नेहमी तत्पर असते. हा उपक्रम त्याच मानवी संवेदनेचा आणि सामाजिक बांधिलकीचा जिवंत पुरावा आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment