चंद्रपूर: आदिवासी समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी चंद्रपूर येथे आयोजित मोर्चात सहभागी होणाऱ्या बांधवांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी सेवा उपक्रम पार पडला. हा लोकोपयोगी उपक्रम लोकनेते, विकासपुरुष माजी मंत्री, आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. मोर्चात सहभागी होणाऱ्या आदिवासी समाजबांधवांना स्नॅक्स, बिस्किटे आणि पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. याबद्दल समाज बांधवांनी आ. सुधीरभाऊंचे आभार मानले आहेत
Service activities for tribal brothers initiated by MLA. Sudhir Mungantiwar
समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या बांधवांना ऊर्जा आणि प्रेरणा मिळावी, त्यांच्या संघर्षात सहकार्य व्हावे, या भावनेतून हा सेवा उपक्रम हाती घेण्यात आला. या उपक्रमात सहभागी सर्वांनी आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या संवेदनशीलतेचे आणि लोकसेवेच्या दृष्टिकोनाचे मनापासून कौतुक केले.
आदिवासी समाजबांधवांनी सांगितले की, “सुधीरभाऊ नेहमीच समाजाच्या प्रत्येक घटकासोबत खंबीरपणे उभे राहतात. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि प्रेरणेमुळे आम्हाला नेहमीच लोकसेवेची उर्जा मिळते. अशा जनसेवेची प्रेरणा आम्हाला सतत मिळत राहो हीच शुभेच्छा!”
या सेवा उपक्रमात भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. त्यामध्ये धनराज कोवे, सौ. चंद्रकलाताई सोयाम, सौ. मायाताई उईके, सौ. शीतलताई आत्राम, सौ. ज्योती गेडाम, शीतल कुलमेथे, विक्की मेश्राम, पुरुषोत्तम साहारे, रवी लोणकर, सचिन कोतपल्लीवार, गणेश गेडाम, च्यांदभाई सय्यद, मनोज पोतराजे, प्रलय सरकार, राजू सेन, कैलास सांगेवार, भूषण आत्राम, गौरव पारधे, आशुतोष अत्राम, जयश्री आत्राम, विजय आत्राम, मुकेश मेश्राम, प्रभाकर गेडाम, सूरज कोवे, निखिल मेश्राम, जीवन गेडाम, अनिल गेडाम आणि सुरेश पेंडाम आदींची उपस्थिती होती.
या उपक्रमामुळे आदिवासी समाजातील बांधवांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, समाजहितासाठी सातत्याने कार्यरत राहणाऱ्या सुधीरभाऊंच्या जनसेवेच्या भावनेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0 comments:
Post a Comment