चंद्रपूर : ब्रम्हपुरी वन विभागातील सुप्रसिद्ध नर वाघ T-40 उर्फ ‘बिट्टू’ याचा रविवारी (१२ ऑक्टोबर) रोजी रात्री सुमारे अकरा वाजताच्या सुमारास झालेल्या रेल्वे अपघातात मृत्यू झाला. गोंदिया-बल्लारशहा पॅसेंजर गाडी (क्रमांक ६८८०४) ने धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. सिंदेवाही रेल्वे स्थानकापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर, सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील कारगाट नियतक्षेत्र (कक्ष क्रमांक 1338/741) येथे हा दुर्दैवी प्रकार घडला. Tiger Death in Accident
Famous tiger 'Bittu' dies in train collision
वनविभागाच्या माहितीनुसार, मृत वाघाचे वय अंदाजे १३ ते १४ वर्षांच्या दरम्यान होते. ब्रम्हपुरी परिसरातील जंगल पट्ट्यांमध्ये फिरणारा हा अनुभवी नर वाघ ‘T-40’ या ओळखीने प्रसिद्ध होता. स्थानिक लोक व वन्यजीवप्रेमी यांना तो ‘बिट्टू’ या नावाने विशेष परिचित होता.
घटनेची माहिती मिळताच एनटीसीएचे अधिकारी काळे, ब्रम्हपुरी वन विभागाचे उपवनसंरक्षक डॉ. कुमारस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक डॉ. महेश गायकवाड, सिंदेवाहीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली सायंकार व क्षेत्र सहाय्यक नितीन गडपायले यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पथकाने मृत वाघाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून, पुढील कार्यवाही सुरू आहे.
या घटनेमुळे वन्यजीवप्रेमी व स्थानिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
0 comments:
Post a Comment