चंद्रपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, चंद्रपूर येथे १५ व १६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेमध्ये तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. शहरात मोठ्या प्रमाणात बौद्ध अनुयायांची गर्दी अपेक्षित असल्याने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही अधिसूचना पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन (भा.पो.से.) यांनी जारी केली आहे. ही अधिसूचना १५ ऑक्टोबर सकाळी ८ वाजल्यापासून ते १७ ऑक्टोबर सकाळी ८ वाजेपर्यंत लागू राहणार आहे.
Traffic changes in Chandrapur on the occasion of Dhamma Chakra Reenactment Day
या काळात दीक्षाभूमी परिसरातील पाण्याची टाकी चौक, जुना वरोरा नाका, मित्रनगर चौक, जिल्हा स्टेडियम आदी मार्गांवरील सर्व प्रकारची वाहतूक बंद राहील. परिसर नो पार्किंग व नो हॉकर्स झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. नागपूर, मुल व बल्लारपूरकडील जड वाहनांना पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत, तर हलकी वाहने ठरविलेल्या मार्गानेच वळवण्यात येतील. भाविकांसाठी शकुंतला लॉन, सेंट मायकेल स्कूल, जनता कॉलेज, सिंधी पंचायत भवन आदी ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
0 comments:
Post a Comment