चंद्रपूर:- मनसेचे जिल्हा सचिव श्री. किशोर मडगूलवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दहा ऑक्टोबर रोजी मनसेच्या शाखेचे उद्घाटन तथा भव्य पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला..
Maharashtra Navnirman Sena District Secretary Mr. Kishore Madgulwar's birthday was marked by the inauguration of the MNS branch and a grand party induction ceremony. नेहमी स्वतःला समाजकार्यात झोकुन देणारे किशोर मडगुलवार सदैव प्रभागातील नागरिकांच्या न्याय हक्कासाठी आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तत्पर असतात १० ऑक्टोबर या त्यांच्या वाढदिवशी महाकाली कॉलरी प्रकाश नगर येथे हजारो कार्यकर्त्यांसह शाखा निर्माण केली या शाखेचे उद्घाटन मनसेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राहूल बालमवार तथा मनसेचे माजी नगरसेवक तथा चंद्रपूर शहराध्यक्ष सचिन भोयर यांच्या हस्ते पार पडले त्यानंतर मनसेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांणा प्रेरीत होऊन महाकाली कॉलरी प्रकाश नगर येथील शेकडो युवकांनी मनसेचा झेंडा हाती घेत भव्य पक्षप्रवेश केला यावेळेस जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी सर्वांना शुभेच्छा देऊन आम्ही सर्व आपल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले त्याच प्रमाणे मनसेचे चंदपूर शहराध्यक्ष सचिन भोयर यांनी मार्गदर्शन करतांना विकास करायचा असेल तर आता मनसे शिवाय पर्याय नाही असे सांगून आपण राजसाहेबांचे हाथ बळकट करण्यासाठी आव्हान केले यावेळेस मनविसे जिल्हाउपाध्यक्ष कुलदिप चंदणखेडे, मनोज तांबेकर, बल्लारपूर तालुका मनसे महिलासेना अध्यक्षा कल्पना पोर्तलावार, प्रकाश नागरकर, वर्षा बोमले, पोंभूर्णा मनविसे तालुकाध्यक्ष आशिष नैताम, चंद्रपूर ता. उपाध्यक्ष प्रविण शेवते, मनसेचे रुग्णमित्र क्रिष्णा गुप्ता, मयुर मंदनकर राजु देवांगण साहील पटान तथा पदाधिकारी व असंख्य मनसैनिक प्रामुख्याने उपस्थित होते
0 comments:
Post a Comment