चंद्रपूर :
दुर्गापूर पोलिसांनी दोन वेगवेगळ्या चोरीच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश करत आरोपीस अटक केली असून, त्याच्याकडून चोरीस गेलेल्या दोन मोटारसायकली एकूण ५०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Successful action by Durgapur Police - Theft accused arrested, two motorcycles and valuables worth Rs. 50,000 seized
पोलीस ठाणे दुर्गापूर हद्दीतील CSTPS मेजर गेट ऊर्जानगर येथून दिनांक २० ते २३ सप्टेंबर २०२५ दरम्यान आणि WCL कॉलनी शक्तिनगर, मेजर गेट ऊर्जानगर येथून दिनांक १७ ते १८ जून २०२४ दरम्यान चोरी झाल्याचे अनुक्रमे गुन्हा क्र. 236/2025 कलम 303(2) आणि गुन्हा क्र. 181/2024 कलम 379 भा.द.वि. अंतर्गत नोंद करण्यात आले होते.
या दोन्ही प्रकरणांत आरोपी संदीप रामभाऊ पाटील (वय ४० वर्ष, रा. कोंढी, वार्ड क्र. ०५, ऊर्जानगर) यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून चोरीस गेलेल्या दोन मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे, व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. संदीप एकाडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
या कारवाईत पो.उपनि. प्रविण बिनकलवार, पो.हवा. योगेश शार्दूल, ना.पो.अं. मोरेश्वर गोरे, पो.अं. मंगेश शेंडे, किशोर वलके, सोनाल खोब्रागडे आणि रुपेश सावे यांनी मोलाची भूमिका बजावली.
0 comments:
Post a Comment