Ads

गोपनीय माहितीवरून जनावरांच्या अवैध वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

चंद्रपूर, दि. 15 ऑक्टोबर :
स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे गडचिरोलीवरून नागपूरकडे अवैधरित्या जनावरे वाहतूक करणाऱ्या ट्रकवर नागभीड परिसरात मोठी कारवाई केली. या कारवाईत 2 नाग म्हैशी आणि 14 हल्ले (रेडे) अशी एकूण 16 जनावरे क्रूरपणे बांधून वाहतूक केली जात असल्याचे आढळले.
Local Crime Branch takes strong action against illegal animal trafficking based on confidential information
पोलिसांनी संबंधित जनावरे ताब्यात घेत मौजा कोठेगाव (पो. स्टे. नागभीड) येथे आणून ट्रकमधील सर्व जनावरे प्यार फाउंडेशन, चंद्रपूर येथे सुरक्षित ठेवली आहेत.

या प्रकरणी पोलिस स्टेशन नागभीड येथे गुन्हा क्र. 165/2025 नोंद करण्यात आला असून,
कलम 11(1)(घ)(ड)(च)(ज) — भारतीय प्राणी क्रूरता प्रतिबंध अधिनियम 1960 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींची नावे पुढीलप्रमाणे :
1️⃣ फिरोज समीर खान (वय 26)
2️⃣ आजाद रविदाद खान (वय 19) — दोघेही रा. भीमगड कॉलनी, ता. छपरा, जि. शिवनी (म.प्र.)
3️⃣ सुनील चंद्रकुमार जेलेशिया (वय 21), रा. बोटाटोला, ता. धुलिया, जि. राजनांदगाव
4️⃣ पाहिजे आरोपी — जमीर कुरेशी, रा. नागपूर
जप्त मालमत्ता :
16 नग जनावरे (म्हैस व रेडे) — अंदाजे किंमत ₹6,40,000/-
ट्रक क्र. MH40CT2954 — किंमत ₹20,00,000/-
एकूण जप्त मालाची किंमत ₹26,40,000/-
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या उपविभागीय पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
जनावरांच्या क्रूर व अवैध वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस दलाने दाखवलेली तत्परता प्रशंसनीय ठरली आहे.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment