Ads

चंद्रपूरमध्ये १३ ऑक्टोबर रोजी आदिवासी समाजाचा महा आक्रोश मोर्चा; वाहतूक मार्गात बदल

चंद्रपूर, ता. ११ ऑक्टोबर २०२५ – चंद्रपूर शहरात येत्या १३ ऑक्टोबर रोजी आदिवासी समाजाच्यावतीने विविध मागण्यांसाठी ‘महा आक्रोश मोर्चा’चे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा सकाळी १२ वाजता कोहीनूर ग्राउंड येथून सुरू होणार असून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचणार आहे. या मोर्चात चंद्रपूर जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी होणार आहेत.
Maha Akrosh March of tribal community on October 13 in Chandrapur; Traffic route changed
मोर्चाचा मार्ग – कोहीनूर ग्राउंड, अंचलेश्वर गेट, कस्तुरबा चौक, गांधी चौक, जयंत टॉकीज चौक, जटपुरा गेट, प्रियदर्शनी चौक, जिल्हाधिकारी कार्यालय असा असणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सकाळी ११:०० ते संध्याकाळी ६:३० वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

वाहतूक मार्गात बदल:
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन (भा.पो.से.) यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३३(१)(ब) अंतर्गत मिळालेल्या अधिकाराचा वापर करून वाहतूक व्यवस्थेत पुढीलप्रमाणे बदल करण्याचे आदेश दिले आहेत:

1. बल्लारपूर कडून येणारी वाहने (जड वाहन वगळून) – अंचलेश्वर गेटमार्गे पंजवर्धकडे वळविण्यात येणार.
2. नागपूर/मूल मार्गे येणारी वाहने (जड वाहन वगळून) – पंचशील चौक, श्री टॉकीज चौक, पठाणपुरा परिसराकडे जाण्यासाठी वरोरी नाका, मित्रनगर चौक, जेष्ठ नागरिक भवन, संत केवलराम चौक, विदर्भ हाऊसिंग चौक, बिनबा गेट मार्गाचा वापर करावा.
3. रामाळा तलाव, बगल खिडकी, गंज वॉर्ड, भानापेट परिसराकडे येणाऱ्या वाहनांसाठी – सावरकर चौक, बस स्टँड चौक, RTO कार्यालय मार्ग सुलभ राहील.



वाहने पार्किंगसाठी व्यवस्था:
बल्लारपूरकडून येणाऱ्यांसाठी – महाकाली मंदिर समोरील बैल बाजार आणि महाकाली यात्रा ग्राउंड.
मूलकडून येणाऱ्यांसाठी – एस.बी.आय. बँक समोरील ग्राउंड (मूल रोड).
नागपूरकडून येणाऱ्यांसाठी – न्यू इंग्लिश ग्राउंड (नागपूर-चंद्रपूर रोड).

महत्त्वाची सूचना:
मोर्चाच्या मार्गावरील रस्ता 'नो हॉकर्स झोन' म्हणून जाहीर करण्यात आले असून या भागात कोणतीही वाहने पार्किंग करू नयेत. जड वाहन चालक आणि इतर नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय वरील मार्गाचा वापर करू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

पोलीस प्रशासनाने नागरिकांना शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. सदर अधिसूचना वेळेनुसार बदलली जाऊ शकते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment