बल्लारपूर (ता. प्र.): बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या जबरी चोरीच्या प्रकरणी पोलिसांनी एक आरोपीला अटक केली असून, दोन आरोपी अद्याप फरार आहेत. crime
संबंधित गुन्हा अप.क्र. 795/2025 भा.दं.वि. कलम 309(4), 3(5) भान्यासं अंतर्गत नोंदविण्यात आला असून, आरोपी सचिन सुरेश तोकलवार (वय 24, रा. बल्लारपूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून विचारपूस केली असता, त्याने करण जीवणे (रा. बल्लारपूर) व आणखी एका इसमासोबत मिळून सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
राजुरा उपविभागातील गडचांदूर पथकाने स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांसह पेट्रोलिंगदरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली. आरोपीला वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
दरम्यान, उर्वरित दोघा पाहिजे आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
0 comments:
Post a Comment