Ads

गौवंश तस्करीप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल – २५ जनावरांची सुटका, १८.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त...

उमरी पोतदार (जि. चंद्रपूर) | ११ ऑक्टोबर २०२५:
तेलंगानाहून बेकायदेशीररित्या कत्तलीसाठी नेत असलेल्या २५ गौवंश जनावरांची उमरी पोतदार पोलिसांनी सुटका केली आहे. या प्रकरणात चार आरोपींना अटक करून दोन पिकअप वाहने, चार मोबाईल फोनसह एकूण ₹१८,९५,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. cow smuggling
Case registered against four in cow smuggling case – 25 animals rescued, valuables worth Rs 18.95 lakh seized
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ ऑक्टोबरच्या पहाटे पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की, दोन पिकअप वाहनांद्वारे गौवंश जनावरांची अवैधरित्या वाहतूक होत आहे. यावरून उमरी पोतदार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डोंगर हळदी रोडवर नाकाबंदी करून दोन संशयित वाहने थांबवण्यात आली. पंचासमक्ष तपासणी केली असता, सदर वाहनांमध्ये एकूण २५ गौवंश जनावरे कोंबून कत्तलीसाठी नेत असल्याचे आढळून आले.

या प्रकरणी खालील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे:
1. मंगेश शामराव चौधरी (वय २८, रा. लक्कडकोट)
2. राजेश गजानन घोगरे (वय २७, रा. बेंबाळ)
3. मोहम्मद अजीज अली (वय २४, रा. वाकडी)
4. मिर्झा अजीज बेग (वय २२, रा. वाकडी)
या आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३२५, तसेच प्राणी संरक्षण अधिनियम आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

जप्त मालमत्ता:
महिंद्रा बोलेरो पिकअप (TS20-T-4967)
महिंद्रा बोलेरो पिकअप (MH34-BZ-8425)
२५ नग गौवंश जनावरे
४ मोबाईल फोन
एकूण किंमत: ₹१८,९५,०००/-


पोलिसांचे नेतृत्व:
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सत्यजीत आमले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राहुल ठेंगणे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या कारवाईत पोहवा/९०८ सुभाष राऊत, पोअं/१३६६ सतीश झाडे, पोअं/२८४१ विनोद चौधरी, पोअं/५७६ राहुल शंखावार, पोअं/११५ सुरज बुजाडे, चापोअं/१२४५ दिनेश देवाडे, पोअं गोपाल घुमडेवाड यांचा सहभाग होता.

सदर जनावरांची वैद्यकीय तपासणी करून डॉक्टरांकडून प्रमाणपत्र घेतले असून, सर्व जनावरे "प्यार फाउंडेशन" येथे जमा करण्यात आली आहेत.

पुढील तपास उमरी पोतदार पोलिसांकडून सुरू आहे.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment