भद्रावती तालुका प्रतिनिधि :-भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथील आदिवासी माना जमात संघटनेच्या वतीने दोन दिवसीय ५ व ६ फेब्रुवारी २०२३ ला समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम राजमाता माॅ.मानिका क्लब ग्राउंड नुकताच संपन्न झाला. पहिल्या दिवशी सकाळी स्वच्छता अभियान राबवून परिसर स्वच्छ करण्यात आला.सर्व माना जमातिमधिल बांधवांनी आपल्या रुढी, परंपरेनुसार खण,मुठपुजा,डायका कार्यक्रम पार पडला. दुपार नंतर महिलांसाठी हळदीकुंकू व लंगडि, रस्सीखेच,संगीत खुर्ची इत्यादी विविध क्रिडा स्पर्धा घेण्यात आल्या.रात्रो ला आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडला गेला.
दुसऱ्या दिवशी माना जमातिचे आराध्य दैवत राजमाता माॅ मानिका देवीच्या प्रतिमेची महामानवाच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. कोरोना चा प्रादुर्भाव असतानासुद्धा कोरोना नियमांचे पालन करुन मंडळाने खंड पडू न देता आभासी समाजप्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मुरवणुकिचा समारोप आदिवासी संकल्प घेऊन करण्यात आला. प्रबोधनात्मक कार्यक्रम महामानवाच्या प्रतिमेच पुजन व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रम प्रसंगी उद्घाटक म्हणून नयन जांभूळे सरपंच यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सदाशिव दोडके, तर प्रमुख अतिथी कवडु खडसंग,उपस्थित होते.यावेळी प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते राकेश घरत,नंदू जांभूळे, प्रामुख्याने हजर होते.मार्गर्शक मंडळींनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सामुहिक प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली.समाजाने एकत्रित राहायला पाहिजे. समाजाच्या इतिहासावर प्रकाश टाकला .व आदिवासी समाज पद्धतीने विवाह सोहळे पार पडावे असे प्रतिपादन केले .यावेळी समाज बांधव व गावकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन:- माधव नन्नावरे, प्रास्ताविक प्रशांत नन्नावरे,व आभार अनिल हनवते यांनी केले. सामुहिक महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समस्त आदिवासी माना जमात संघटन व बंधू-भगीनींनी व ग्रामवाशियांनी मोलाचे सहकार्य केले.
0 comments:
Post a Comment