Ads

ग्रामपंचायत कुकडहेटी सरपंचाचा मनमानी कारभार, कार्यवाही करा पत्रकार परिषदेत तीन ग्रा. सदस्याचा आरोप

Arbitrary management of Gram Panchayat Kukdaheti Sarpanch, take action. Member's allegation

सिंदेवाही प्रतिनिधी :- सिंदेवाही तालुक्यातील ग्रामपंचायत कुकडहेटी येथील सरपंच कोणत्याही मासिक सभेमध्ये खनिज विकास निधी योजनेअंतर्गत मंजूर काम विषयी चर्चा न करता परस्पर कामे खाजगी कंत्राटदाराच्या मदतीने करण्याचा घाट माडून स्वतःचा मनमानी कारभार करती असल्याचा आरोप कुकडहेटी येथील तीन ग्रामपंचायत सदस्यांनी पत्रकार परिषदल केला आहे.
सविस्तर वृत्त असे आहे की ग्रामपंचायत कुकडहेटी येथील जि. प शाळा चारगाव, जि.प. शाळा ब्राम्हणी, तसेच जि.प शाळा चक ब्राम्हणी येथे खनिज विकास निधीअंतर्गत संरक्षण भिंतीचे काम सन 2021- ला मंजूर झाले होते. सदर काम ग्रामपंचायत स्वतः करणार असल्याचा ठराव प्रशासक काळामध्ये पारवून दिला होता, नंतर ग्रामपंचायत कडे काम हस्तातरीतसुद्धा झाले. फेब्रुवारी 21 ला ग्रामपंचायत निवडणूक होवून नवीन सत्ता स्थापित झाली.

त्यांनतर खाजगी कंत्राटदार व सरपंच रामचंद्र श्रीरामे यांनी ग्रामपंचायतची कोणतीही परवानगी व इतर तांत्रिक मान्यता नसताना सुद्धा बांधकाम करण्यासाठी इंजीनिअर येडे यांच्यासोबत येवून ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता लेआउट टाकून काम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तसेच कामाचे वर्क ऑर्डर व इस्टिमेट स्वतः आणून ग्रामपंचायतला न देता करीत असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य स्वाती जांभुळे, रागिणी लेनगुरे व लताबाई गरमळे यांची पत्रकार परिषदेत केला आहे.

सदर ग्रामपंचायत सरपंच हे आम्हाला कोणत्याही सभेत विश्वासात न घेता काम करीत असून त्यांना संवर्ग विकास अधिकारित तसेच इंजिनिअर यांचा पाठबळ असल्याचा आरोप यावेळी केले. तसेच संवर्ग विकास अधिकारित है नेहमी याविषयी दुर्लक्ष करीत असून याविषयी वरिष्ठ स्तरावर दाद मागणार असणार असल्याचे यावेळी सांगितले .त्यामुळे सरपंच रामचंद्र श्रीरामे हे आपल्या पदाचा दुरुपयोग करीत असून यावर ग्रामपंचायत अधिनियमा अंतर्गत कार्यवाही करण्याची मागणी यावेळी पत्रकार परिषदेत केली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment