क्रेटामधून विदेशी दारूची तस्करी; भद्रावतीत पोलिसांचा दणका!

भद्रावती | प्रतिनिधी – जावेद शेख: अवैधरित्या विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाने धडक कारवाई करत दोन जणांना ताब्यात घेतले. भद्रावती हायवेवरील जमघाट हॉटेलसमोरील रस्त्यावर नाकाबंदी करून करण्यात आलेल्या या कारवाईत विदेशी दारूसह वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली हुंदाई क्रेटा कार असा एकूण ११ लाख ३७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई १६ नोव्हेंबर २०२६ रोजी करण्यात आली.
Smuggling of foreign liquor from Crete; Police bust in Bhadravati!
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक भद्रावती परिसरात पेट्रोलिंग करीत असताना विदेशी दारूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार भद्रावती हायवेवरील जमघाट हॉटेलसमोर नाकाबंदी करण्यात आली. यावेळी संशयित हुंदाई क्रेटा वाहन अडवून तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात रॉयल स्टॅग विदेशी दारू आढळून आली. पोलिसांनी वाहनातील दोन्ही इसमांना ताब्यात घेत दारूसाठा आणि वाहन जप्त केले.

जप्त केलेल्या मुद्देमालात १८० मिलीच्या रॉयल स्टॅगच्या १९२ निपा (४८ हजार रुपये), ९० मिलीच्या ४०० निपा (५६ हजार रुपये) आणि २००० मिलीच्या १२ बंपर (३३ हजार ६०० रुपये) यांचा समावेश आहे. तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली हुंदाई क्रेटा कार (क्रमांक MH31EF 3700) अंदाजे १० लाख रुपये किमतीची जप्त करण्यात आली. अशा प्रकारे एकूण ११ लाख ३७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

या प्रकरणी विलास किसन रंगारी (वय ४५, रा. सुरक्षा नगर, भद्रावती) आणि मिलिंद गोरखनाथ रामटेके (वय ४८, रा. शिवाजीनगर, भद्रावती) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध भद्रावती पोलीस ठाण्यात अप. क्र. १०६९/२६, महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई)(अ), ८३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पीएसआय सर्वेश बेलसरे, पोलीस हवालदार सुभाष गोहोकार, सचिन गुरनुले, रजनीकांत पुठ्ठावार, पोलीस शिपाई विठ्ठल काकडे, प्रफुल्ल पुप्पलवार, प्रतीक हेमके आणि वाहनचालक दिनेश अराडे यांच्या पथकाने केली. उपविभाग वरोरा पथक व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांच्या संयुक्त सहभागातून ही कारवाई करण्यात आली.




Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment