चिमूरच्या जंगलात वाघांची 'पंचक' एन्ट्री! एकाच ठिकाणी पाच वाघांचे दर्शन

चिमूर : तालुक्यातील मासळ-पळसगाव मार्गावर वन्यप्राण्यांच्या अस्तित्वाची पुन्हा एकदा थरारक झलक पाहायला मिळाली. करबडा रोड कॉर्नरजवळील झील रिसॉर्ट परिसरात एकाच वेळी तब्बल पाच वाघ नागरिकांच्या नजरेस पडल्याची माहिती समोर आली आहे. एकाच ठिकाणी पाच वाघ दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये आश्चर्याबरोबरच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 'Panchak' entry of tigers in Chimur forest! Five tigers seen at one place

जंगल परिसरातून मार्गक्रमण करणाऱ्या या वाघांचे एकाच वेळी दर्शन झाल्याने हा परिसर पुन्हा एकदा वन्यजीवांच्या अधिवासाच्या दृष्टीने चर्चेत आला आहे. वाघांची ही संख्या पाहता परिसरातील नागरिक, वाहनचालक आणि शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

दरम्यान, नागरिकांनी या मार्गावरून प्रवास करताना सतर्क राहावे. वाघ दिसल्यास त्यांच्या जवळ जाणे, फोटो किंवा व्हिडिओ काढण्यासाठी गर्दी करणे, आरडाओरड करणे अथवा त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करणे टाळावे. वन्यप्राण्यांना सुरक्षित अंतरावरूनच पाहावे आणि कोणताही धोका जाणवल्यास वनविभागाला तातडीने माहिती द्यावी.

जंगलाचा राजा एकटा नाही, तर पाच जणांच्या ताफ्यासह रस्त्यावर! चिमूर तालुक्यातील या घटनेमुळे वन्यजीवांच्या उपस्थितीची पुन्हा एकदा जाणीव झाली.


Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment