तीन गुंड प्रवृत्तीच्या इसमांचा कपड्याच्या दुकानात धिंगाणा!

भद्रावती जावेद शेख प्रतिनिधी : शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या तनोज फॅशन या कपड्यांच्या दुकानात तीन गुंड प्रवृत्तीच्या इसमांनी धिंगाणा घालत जबरदस्तीने कपडे घेऊन पैसे न देता पसार झाल्याची घटना १४ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून एक आरोपी फरार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तनोज फॅशनचे मालक तनोज पंडित हे दुकानात असताना अमन शेख, गोलू बिस्मला (दोघेही रा. सुमठाणा) आणि अजित चेट्टी हे तिघे दुकानात आले. त्यांनी दुकानातून कपड्यांची खरेदी केली. या खरेदीचे एकूण बिल १७ हजार ७०० रुपये झाले. दुकानमालक तनोज पंडित यांनी बिलाची रक्कम मागितली असता तिघांनी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला.

यावेळी 'हम को पहचानते नही क्या, हम कौन है?' असे म्हणत त्यांनी दुकानमालकाला धमकी दिली. त्यानंतर कोणतीही रक्कम न देता जबरदस्तीने कपडे घेऊन तेथून पळ काढला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे दुकानमालकात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

या घटनेची तक्रार तनोज पंडित यांनी पोलिसांत दाखल केली. तक्रारीवरून संबंधित तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अमन शेख आणि गोलू बिस्मला यांना अटक केली आहे. तर अजित चेट्टी हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

यापूर्वीही अशाच प्रकारच्या घटना?

विशेष म्हणजे, या तिन्ही आरोपींनी यापूर्वीही शहरातील इतर दुकानांमध्ये अशाच प्रकारे वस्तूंची खरेदी करून पैसे न देता दुकानदारांची फसवणूक केल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. त्यामुळे हा प्रकार केवळ एका दुकानापुरता मर्यादित नसून अशा प्रवृत्तीच्या इसमांवर कठोर कारवाई करण्याची मागणी व्यापारी वर्गातून होत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment