Ads

*वसंत पंचमी निमित्य धानोली येथे धार्मिक कार्यक्रमभद्रावती,दि.६ (तालुका प्रतिनिधी):-
‌ वसंत पंचमी निमित्य भद्रावती तालुक्यातील धानोली येथे दि.६ फेब्रुवारी रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
धानोली येथून एक किलोमीटर अंतरावर विठ्ठल- रुक्मिणीचे पुरातन मंदिर आहे. या. मंदिरात सकाळी घटस्थापना करून भजन, कीर्तन, प्रवचन व दहीहांडी कार्यक्रम घेण्यात आले विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे मंदिराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. महाप्रसाद वितरणाने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोकुल भाऊ रोडे, राजु ‌रोडे, अमोल देऊरकर, बालाजी रोडे, चंद्रसेन देरकर, प्रफुल्ल रोडे, मंगेश रोडे, सुधीर धनराज रोडे, मुकूल रोडे, गोलु भाऊ, डॉ रोडे, डाहुले महाराज, नंदु, युवराज, मंगेश इत्यादींनी परीश्रम घेतले. कार्यक्रमाला भद्रावती तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रशांत काळे यांनी भेट दिली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment