Ads

घुग्घुस शिवनगर मध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करा -आम आदमी पार्टीची मागणी..!

sort out the problem of drinking water in Ghugus Shivnagar - Demand of Aam AadmiParty ..!
घुग्घुस :-
घूग्घुस येथील शिवनगर वार्ड क्रमांक 05 इथे मागील 25-30 वर्षांपासून नागरिक राहात आहेत. परंतु ग्रामपंचायत काळापासून ते घूग्घुस नगरपरिषद झाली असून सुद्धा तिथे पाण्याची कुठलीच व्यवस्था नसल्यामुळे तेथील स्थानिक नागरिकांना गेल्या कित्तेक वर्षांपासून पाण्याच्या समस्सेला सामोरे जावे लागत आहे.पाणी हे दैनंदिन जीवनाचा महत्वाचा घटक असून सुद्धा स्थानिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते ही खूप दुर्दैवी बाब आहे.एकीकडे संपूर्ण जग चंद्रावर पाणी शोधत आहे आणि दुसरीकडे शिवनगर मध्ये पाण्याची कुठलीच व्यवस्था नाही.सोबतच उन्हाळा येत असल्यामुळे पाण्याच्या दुष्काळाची समस्या साहजिकच वाढणार आहे.
ही सर्व बाब लक्षात घेता आम आदमी पार्टी घूग्घुस द्वारा शिवनगर मध्ये पाण्याची टाकी उभारून नवीन पाइप लाइन टाकण्याची मागणी करण्यात आली अन्यथा येत्या काही दिवसांमध्ये समस्त शिवनगर वासियांना घेऊन नगरपरिषद कार्यालय घूग्घुस सामोर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी आम आदमी पार्टी, घुग्घुस महिला सदस्य उमा टोक्कलवार, पूनम वर्मा,विपश्यना अनुप धनविजय,सोनम शेख,अंजली नगराळे,रूबिया शेख,विजया उपलेट्टी,शिला उपलेट्टी,हसीना शेख,कविता विष्णु भक्त,देविणा नाईकाप,नईमा शेख,धम्मदिणा नायडू सोबत,शहर अध्यक्ष अमित बोरकर, उपाध्यक्ष अभिषेक सपडी, सचिव संदीप पथाडे, विकास खाडे, आशिष पाझारे, प्रशांत पाझारे, प्रशांत सेनानी, रवी शंतलावार, अभिषेक तलापेल्ली, अनुप नळे, स्वप्नील आवळे,सागर बिऱ्हाडे, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते...
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment