Ads

केपीसीएल प्रकल्पग्रस्तांच्या समर्थानात भाकपाचे आंदोलन


भद्रावती:-कर्नाटका पॉवर कार्पोरेशन लिमिटेड बंगलोर प्रणित एकात्मिक बरांज खुली कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांच्या समर्थानात भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे शेकडोंच्या संख्येने आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदार यांचे मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन पाठविण्यात आले.
दि.३ मार्चला दुपारी १ वाजता तहसील कार्यालयाचे प्रांगणात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सहसचिव काम्रेड राजू गैनवार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. कर्नाटक सरकारच्या वतीने २००७ पासून तालुक्यातील बरांज गावाजवळ खुली कोळसा खाण सुरू आहे.यात ६ कोल ब्लॉक आहे. सध्या बरांज कोल ब्लॉक मधून कोळशाचे उत्खनन व विक्री सुरू आहे.हा ब्लॉक बरांज आणि चिचोर्डी या दोन शिवेत येतो.बरांज हा ग्रामिण तर चिचोर्डी हा नगर पालिका क्षेत्रात येतो.चिचोर्डी या क्षेत्रातील शेतजमिनीचे शासकिय दर जास्त आहे .त्यामुळे कंपनी या शेतजमिनी घेण्यास टाळाटाळ करीत आहे. या भागातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी इच्छामरण आंदोलनाचा शासनास इशारा दिला.त्यांचे समर्थानात भाकपा तर्फे हे आंदोलन करण्यात आले. यावेळी कंपनीच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.
नंतर तहसीलदार अनिकेत सोनवणे यांना निवेदन देण्यात आले.तहसीलदार यांनी सुरुवातीला निवेदन घेण्यास टाळाटाळ केली.त्यामुळे त्यांचे कंपनीशी लागेबांधे असावे असा आरोप कॉ.राजू गैनवार यांनी केला.निवेदनाच्या प्रति राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय कोळसा खाण मंत्री,राज्यपाल, मुख्यमंत्री, महसूलमंत्री, पालकमंत्री, यांना पाठविण्यात आल्या. यावेळी कॉ.सागर भेले, कॉ.सुरेश कांबळे,नाना चटपल्लीवार,संतोष सातभाई, ए.के.कॅप्टन, दिलीप वनकर,बेबीताई कुळमेथे,संगीता गेडाम,निलेश पचारे, नितीन कावटी यांचेसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment