Ads

घुग्घुस भाजपातर्फे वेकोली विरोधात रस्ता रोको व भजन आंदोलन

घुग्घुस :- गुरुवार 3 मार्च रोजी सकाळी 9 वाजता येथील कॉ. नं. 2 जवळील बहिरमबाबा देवस्थान समोर घुग्घुस भाजपातर्फे भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्त्वात रस्ता रोको व भजन आंदोलन करण्यात आले.
सकाळी 9 वाजता पासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत रस्ता रोको आंदोलन सुरु असल्याने तब्बल 3 तास कोळश्याची वाहतूक ठप्प झाल्याने कोळशाच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

मागील काही महिन्यापासून येथील बहिरमबाबा देवस्थानात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, समोरील रस्त्यावर कोळश्याची धूळ साचून राहते व रस्त्यावर पाणी मारल्या जात नाही, मागील बाजूस मोठा खड्डा पडलेला आहे, मंदिराकडे जाणारा रस्ता खराब झाला आहे तसेच स्मशानभूमी कडे जाणारा रस्ता खराब झाला आहे. मंदिर परिसरातील लावलेली झाडे खराब झाल्याने भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपा नेत्यांनी व कॉ. नं. 2 येथील वार्ड वासियांनी आपल्या मुलाबाळा सह रस्त्यावर ठिय्या मांडून रस्ता रोको व भजन आंदोलन केले. याप्रसंगी वेकोली व्यवस्थापनाच्या विरोधात प्रचंड नारेबाजी व घोषणा बाजी करण्यात आली.
वेकोली व्यवस्थापनाचे ओमप्रकाश फुलारे, संजय विर्मलवार, पिसारोड्डी यांनी आंदोलकांशी चर्चा केली. वेकोलीने लेखी देऊन सर्व मागण्या मान्य करण्याची मागणी आंदोलकांनी रेटून धरली.

बहिरम बाबा मंदिर देवस्थान येथे दिनांक 20 मार्च पर्यंत पाण्याची व पिण्याच्या पाण्याची 24 तास मुबलक व्यवस्था केली जाईल, मंदिरा मागील खड्डा बुझविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे, मंदिरा समोरील रस्त्यावर धूळ साफ करणे व पाणी मारणे सुरु करण्यात आले आहे, मंदिर परिसरात झाडे लावणे व पाणी मारणे सुरु केले जाईल, घुग्घुस ते बहिरमबाबा मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर डोझर मारून रस्ता दुरुस्त करून पथदिवे लावण्यात येईल तसेच स्मशानभूमी कडे जाणाऱ्या रस्त्यावर डोझर मारून रस्ता दुरुस्त करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्याने अखेर आंदोलन मागे घेण्यात आले.

वेकोलीने तत्काळ एक डोझर बोलावून रस्त्यावरील धूळ साफ केली व टँकरने पाणी मारणे सुरु केले.
याप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले घुग्घुस येथील बहिरमबाबा मंदिर देवस्थान हे आम्हा घुग्घुस वासियांचे कुलदैवत आहे येथे मोठयासंख्येत भक्तगण पूजा करण्यासाठी, नवस ठेवण्यासाठी तसेच स्वयंपाक बनवितात याठिकाणी सुविधा नसल्याने येणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो मंदिरास वेकोली तर्फे सर्व सुविधा मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.

यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे,
माजी पं. स. उपसभापती निरीक्षण तांड्रा, माजी सरपंच संतोष नुने, माजी उपसरपंच संजय तिवारी, साजन गोहने, सिनू इसारप, बबलू सातपुते, देवस्थानचे अध्यक्ष शाम आगदारी, मल्लेश बल्ला, शरद गेडाम, राजेश मोरपाका, भीमराव अट्टेला, विकास बारसागडे, तुकाराम गोमासे, विनोद निचकोला, मासा रामन्ना, नंदा कांबळे, राजेश्वरी आगदारी, सरला दुर्गम, मैना कैथल, पदमा अट्टेला, जया जंगम, सुनीता आगदारी, तुळशीदास ढवस, सुधीर आगदारी, राजू इरला, उमेश डाकूर, विजय कुम्मरवार, दिलीप कांबळे, गणेश कोंडागुर्ला, संजय जोगी, विक्की सारसर, वेकोलीचे पीसारोड्डी संजय निर्मलवार, ओमप्रकाश फुलारे उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment