भद्रावती :- स्थानिक विवेकानंद कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व अंतर्गत तक्रार निवारण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 08 मार्च, 2022 ला सकाळी 12.00 वाजता जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य, डॉ. एन. जी. उमाटे, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. ज्योती राखुंडे, प्रा. संगिता बांबोडे, डॉ. यु. सी. घोसरे आदी मान्यवर उपस्थित होते.
महिला दिनाच्या निमित्ताने आनंद पंडिले, सुनील शेंडे, सागर वानखेडे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. ज्योती राखुंडे यांनी केले. अध्यक्षीय मार्गदर्शनात प्राचार्य डॉ. उमाटे म्हणाले की, प्रत्येक स्त्रीला भारतीय राज्यघटनेने स्वातंत्र्य दिले म्हणून प्रत्येक महिलांनी आत्मविश्वास बाळगायला हवा. यामुळे प्रत्येकच क्षेत्रात महिलांची उन्नती होऊ शकते असा संदेश दिला. डॉ. घोसरे यांनी महिलांचे व आईचे महत्त्व सांगितले. विद्यार्थर्थीनींने जागृतीपर नृत्य आणि पथनाट्य सादर केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. काजल सोनवणे आभार प्रगटीकरण प्रा. कु संगिता बांबोडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राध्यापक वृंद, शिक्षक-शिक्षकेतर, विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी सहकार्य केले.
0 comments:
Post a Comment