Ads

आमदारांनी दिले आश्वासनाचे 'चषक''

गडचांदूर :- नागरिकांना दिलेले आश्वासन न पाळणे, निवडणुकांनंतर लोकांना आपल्या मागे धावायला लावणे आणि अत्यंत महत्वाच्या प्रश्नांना बगल देणे हे निवडून आलेल्या राज्यकर्त्यांची लक्षणे असतात की काय ? असा प्रश्न गडचांदुरकर विचारत आहेत. गडचांदूर शहरातील नागरिकांना माणिकगड कंपनीच्या प्रदूषणामुळे रोगराई व डस्टच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत माणिकगड कंपनीने डस्ट कलेक्टर मशीन Dust collector machine by Manikgad company व इएसपी यंत्रणाESP Machine दुरुस्ती करणे आवश्यक आहे. या अनुषंगाने नागरिकांनी फेब्रुवारी महिन्यात आमदार सुभाष धोटे यांची भेट घेतली. या भेटीत आमदार सुभाष धोटे यांनी अधिवेशनात तारांकीत प्रश्न मांडण्याचे आश्वासन दिले असे भेटीसाठी गेलेल्या शिष्टमंडळाने सांगितले होते. महाराष्ट्राचे अधिवेशन सुरू असताना विधानसभेत In the Legislative Assembly हा प्रश्न चर्चेला जाईल असे वाटले. कारण गडचांदूर येथील अनेक सजग नागरिकांनी मा. लोकप्रतिनिधी यांना होत असलेल्या प्रदूषण pollution व गंभीर त्रासाबद्दल अवगत केले होते. आमचे दुर्दैव असे की, इतका तातडीचा प्रश्न असून देखील आमच्या लोकप्रतिनिधीने तो सभागृहात मांडला नाही. विशेष म्हणजे मतदार संघाचा भाग नसलेल्या चंद्रपूर, पोंभूर्णा व नागभिड तालुक्याचे प्रश्न आमदार महोदयांनी सभागृहात मांडले. परंतु, गडचांदूर येथील नागरिकांचा प्रश्न मात्र सभागृहात न मांडता नागरिकांना दिलेले आश्वासन हवेतच विरले.
विशेष म्हणजे गडचांदूर येथे आमदारांच्या संकल्पनेतून व्हालिबाल सामन्यांचे चषक आयोजित केले आहे. या आमदार चषकाला माणिकगड सिमेंट कंपनीचे manikgharh Cement Companyयुनिट हेड उदय पवार, मानिकगडचे वरिष्ठ अधिकारी मयंक श्रीवास्तव यांनी मोठी मदत केली असून कार्यक्रमात त्यांना अतिथी म्हणून बोलाविण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार सुभाष धोटे आहेत. माणिकगड कंपनी प्रशासनाशी आमदार चषकाबाबत आमदार महोदयांनी चर्चा केली आणि त्यांच्याकडून निधी मिळवला असल्याने ते आपला प्रश्न मांडणार कसा अशी चर्चा नागरिकांत आहे.

नागरिकांनी प्रदूषणाला वाचाCitizens to expose the pollution issue फोडण्यासाठी एक कृती समिती तयार केली. मात्र ही कृती समिती प्रदूषणाचा प्रश्न न मांडणाऱ्या विद्यमान लोकप्रतिनिधीला जाब विचारत नाही. किंबहुना कृती समितीतील काही महत्वाचे सदस्य आमदारांच्या राजकीय कार्यक्रमात दिसतात. प्रदूषणाच्या मुद्याचा कळवळा असेल तर आश्वासन देऊन तोंडाला पाने पुसणाऱ्या लोकप्रतिनिधीबाबत अर्वाच्चही काढायचा नाही त्यामुळे काँग्रेस धर्जींन्या काही सदस्यांमुळे कृती समितीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. सामान्य नागरिकांचा राजकीय वापर होत असल्याची बाब उघडकीस आणून देण्याचा प्रयत्न व्हॉट्स ॲप ग्रुपला प्रहारचे सतीश बिडकर यांनी केला असता काँग्रेस पदाधिकारी यांनी अरेरावीची भाषा वापरत त्यांना गृपवरून काढून टाकले व लवकरच आमदार महोदय अधिवेशनात प्रश्न मांडणार असे इतर ग्रुप सदस्यांना आश्वस्त केले होते. मात्र हा प्रदूषणाचा मुद्दा आमदार महोदयांनी अर्थसंकल्प अधिवेशनात मांडला नसल्याने त्यांचा चेहरा उघडा झाला असा आरोप प्रहाचे सतिश बिडकर यांनी केला.

जो पर्यंत विधायक मार्गाने प्रश्नाला वाचा फुटणार नाही तोपर्यंत माणिकगड प्रशासन मुजोरी थांबणार नाही. विद्यमान लोकप्रतिनिधिंचे पाठबळ असल्यामुळे ही कंपनी नागरिकांच्या आरोग्याशी बिनधोक खेळत आहे. लोकप्रतिनिधीला कसे आनंदी ठेवायचे हे कंपनीला चांगले माहिती असल्याने नागरिकांना डस्ट सहन करावा लागत असताना लोकप्रतिनिधी मनिकगड कंपनी प्रदूषणाच्या मुद्द्यावर अर्थसंकल्पिय अधिवेशनात गप्प राहिले अशी चर्चा गडचांदूरात जोर धरू लागली आहे.

मुळात कंपनीच्या युनिट २ ला ना हरकत देण्यासाठी त्यावेळच्या ग्रामपंचायतीने ठराव पारित केला होता त्यावेळी काँग्रेस पक्षाची सत्ता होती. तसेच युनिट २ कार्यान्वित होताना सद्याचे आमदार हेच त्यावेळी आमदार होते त्यामुळे जो पर्यंत आमदार साहेब प्रश्न मांडणार नाही तो पर्यंत नागरिकांचा प्रश्न सुटेल कसा आणि प्रदूषण नियंत्रण होईल कसे असा प्रश्न नागरीक विचारू लागले आहे. नगर परिषदेने कंपनीला पाठविलेल्या कारणे दाखवा नोटीसनंतर कंपनी विरुद्ध कोणतीही कडक कारवाई झाली नसल्याने नगरपरिषदेची माणिकगड मवाळ भूमिका का? व विद्यमान आमदार हा मुद्दा सभागृहात का मांडत नाही? असे प्रश्न नागरीक विचारू लागले आहे.
कृती समितीने ज्या व्यक्तीने बनवली तो काँग्रेस चा पदाधिकारी आहे व आमदार महोदया सोबत त्यांचे खालचे पदाधिकारी सुद्धा कम्पनी कडून आपली पोळी शेकून घेण्याचा काम करत असल्याने कृती समितीतील लोक आमदारांचा निषेध करताना दिसत नाही असा आरोप प्रहारचे सतीश बिडकर यांनी केला.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment