नागभीड :-महाराष्टातील महाविकास आघाडी सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी अद्यापही बोनस घोषित केलेला नाही.महाराष्ट्रातील चंद्रपूर, गडचिरोली,भंडारा,गोंदिया सारख्या धान उत्पादक जिल्ह्यातील शेतकरी पूर्वीच कधी पावसाने,कधी दुष्काळाने तर कधी पिकावरील रोगाने त्रस्त असतो ज्यामुळे बळीराजाला अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या सर्वाची जान ठेऊन आज भारतीय जनता पक्ष नागभीड च्या वतीने *मा.बंटिभाऊ भांगडीया आमदार चिमूर विधानसभा* यांच्या मार्गदर्शनात आणि *श्री.संतोष रडके तालुका अध्यक्ष नागभीड* यांच्या नेतृत्वाखाली मा.तहसीलदार साहेब, नागभीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र यांना निवेदन पाठवण्यात आले. व शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही भाजपा कडून देण्यात आला आहे.
*प्रमुख उपस्थिती* संजयजी गजपुरे जिल्हा संघटन महामंत्री,जगदीश सडमाके तालुका महामंत्री,सुनील शिवणकर तालुका महामंत्री,देवानंद बावनकर अध्यक्ष भाजयुमो,सचिन आकुलवार बांधकाम सभापती,रमेश पां.बोरकर जि. प.प्रमूख,धनराज बावनकर जि. प.प्रमूख,अरविंद भुते जि. प.प्रमूख,परमानंद गहाने,भोजराज लांजेवार,बालुभाऊ मेश्राम,नितेश कुरझेकर,गोपाल नाकाडे,हेमंत नन्नावरे,शिरीष वानखेडे,आनंद कोरे,धनराज ढोक,राजू गजपुरे, भोजराज नवघडे, कू.उज्वला माटे,गीताताई बोरकर व अन्य भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment