Ads

दारू दुकानाच्या परवानगीशी मनपाचा संबंध असतोच

चंद्रपूर : जगन्नाथ बाबा मठासमोरील दारु दुकानाविरोधात परिसरातील नागरिक एकवटले आहेत. गजबजलेल्या व धार्मिक स्थळाच्या शेजारी देशी दारुच्या दुकानाला परवानगी दिलीच कशी, असा रोष परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत. दरम्यान मनपाने दारु दुकानाच्या परवानगीशी मनपाचा संबंधच नसतो, असे हास्यास्पद स्पष्टीकरण दिले. मात्र दारु दुकान परवानगीशी मनपाचा कसा संबंधLiquor shop permission is related to the corporation असतो याबाबत आपण लवकरच पुराव्यानिशी खुलासा करणार असल्याचे जनविकास सेनेचे नगरसेवक पप्पू देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकातून कळविले आहे.
१७ एप्रिल रोजी जन विकास सेनेच्या युवा आघाडीचे प्रफुल बैरम, गोलू दखणे तसेच स्थानिक सामाजिक कार्यकर्ते संदीप कष्टी यांच्या नेतृत्वात जगन्नाथबाबा नगर परिसरातील नागरिकांनी उद्घाटनाच्या दिवशीच देशी दारूचे दुकान बंद पाडले होते. त्यानंतर दारू दुकानासमोर नागरिकांनी सत्याग्रह आंदोलन सुरु केले. महिलांनी भजन आंदोलन केले. जिल्हाधिकाऱ्यांना पाच हजार पत्रे पाठविण्याचे अनोखे आंदोलन सुरु केले.
दरम्यान २४ एप्रिल रोजी जगन्नाथबाबा नगरमधील सदर देशी दारू दुकानाच्या परवानगीसंदर्भात महानगरपालिका प्रशासनाकडून प्रसिद्धीपत्रक जाहीर केले. यात दारू दुकानाच्या परवानगीशी मनपा प्रशासनाचा संबंध असल्याची अफवा जाणीवपूर्वक पसरवून मनपाची बदनामी करण्यात येत असल्याचे तसेच दारू दुकानाच्या परवानगीशी मनपाचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. मात्र मनपा प्रशासन नागरिकांची दिशाभूल करीत असल्याची तसेच मनपा प्रशासनाची भूमिका हास्यास्पद असल्याची प्रतिक्रिया देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. दारू दुकानाच्या परवानगीशी मनपा प्रशासनाचा काय संबंध असतो, याचा लवकरच पुराव्यानिशी खुलासा करणार असल्याचेही त्यांनी कळविले आहे.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment