Ads

भद्रावतीचे तहसीलदार सोनवणे यांच्यावरील हल्ला प्रकरणी आरोपींना 13 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी

(तालुका प्रतिनिधी, भद्रावती):- भदावती तालुक्यातील चंदनखेडा परिसरात अवैध रेती पकडण्यासाठी गेलेल्या भद्रावती चे तहसीलदार यांच्यावर ट्रॅक्टरचे धडक मारून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना 13 जून पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आरोपी ट्रॅक्टर मालक विलास पांडुरंग भागवत व ट्रॅक्टर चालक ज्ञानेश्वर ननावरे अशी आरोपींची नावे आहेत.
दिनांक 28 ला भद्रावती चे तहसीलदार अनिकेत सोनवणे, नायब तहसीलदार भांदककर व अन्य कर्मचारी चंदनखेडा परिसरात रेती माफियावर कारवाई करण्यास गेले असता त्यांनी तहसीलदारांच्या गाडीला मागून धडक देऊन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता .यातील आरोपींना पोलिसांनी अटक करून भद्रावती पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 13 जून पर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment