तालुका प्रतिनिधी भद्रावती:- तालुक्यातील मागली येथील शेत शिवारात अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीत शेतशिवारातील अनेक शेतकऱ्यांची शेती उपयोगी साहित्य जळून त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या प्रकाराची योग्य ती चौकशी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
या आगीत शेत शिवारातील दिलीप पतंरगे यांच्या शेतात येऊन असलेल्या पाईप पैकी 24 पाईप जळून खाक झाले यात पतंरगे यांचे जवळपास पंधरा ते वीस हजाराचे नुकसान झाले तर शिवारातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत केबल , पाईप व शेती उपयोगी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने त्यांचे किरकोळ आर्थिक नुसकान झाले आहे ऐन हगामाच्या तोंडावर शेती उपयोगी साहित्य जळल्याने खरीप शेती करण्यात शेतकऱ्यांसमोर अडचण निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन शासनाने त्यांना आर्थिक नुकसान भरपाई द्यावी असे मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. सदर आग ही परिसरातील सात ते आठ शेतात पसरल्याने हा परिसर जळुन खाक झाला आहे.

0 comments:
Post a Comment