चंद्रपुर:- चंद्रपूर शहर महानगर पालिकेची हद्दवाढ करण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांना केली होती. सदर मागणीची दखल घेत ना. एकनाथ शिंदे यांनी बैठक घेण्याचे मान्य केले असुन आज दुपारी अडिच वाजता व्हिडीओ कॉन्फरसिंग द्वारे सदर बैठक पार पडणार आहे.
चंद्रपूर महानगरपालिका स्थापना २०१० रोजी झाली. या क्षेत्रामध्ये फक्त चंद्रपूर शहर समाविष्ठ करण्यात आले. परंतु चंद्रपूर शहरालगत असलेले ऊर्जानगर, दुर्गापूर, पडोली, ताडाली, दाताळा, देवाडा, म्हाडा कॉलनी, एम.आय.डी.सी ते आरवट हे भाग औद्योगीक दृष्ट्या संपन्न असून यातील बहुतांश कामगार व कर्मचारी हे चंद्रपूर शहर महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी आहे.

परंतु हा भाग चंद्रपूर शहर महानगरपालिका क्षेत्रात समाविष्ट नसल्यामुळे या भागात अपेक्षीत अशी विकास कामे झालेली नाही. चंद्रपूर शहरालगतच्या ऊर्जानगर, दुर्गापूर, पडोली, ताडाली, दाताळा, देवाडा, म्हाडा कॉलनी, एम.आय.डी.सी, आरवट या ग्रामपंचायत व ईतर ग्रामपंचायती चंद्रपूर शहर महानगरपालिके मध्ये समाविष्ठ करून घेतल्यास या भागाचा सर्वसमावेशक विकास करता येईल त्यामूळे मनापाची हद्दवाढ करुन सदर भाग चंद्रपूर महानगर पालिकेत सामावून घेण्यात यावा अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांना केली होती. याचा पाठपूरावा त्यांच्या वतीने सातत्याने सुरु होता. अखेर या पाठपूराव्याची ना. एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली असुन सदर विषया संदर्भात व्हिडीओ कॉन्फरसिंग द्वारे बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीला चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहे. विशेष म्हणजे आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणी नंतर बाबुपेठ येथील उड्डाण पुलासाठी ना. एकनाथ शिंदे यांनी ५ कोटी २६ लक्ष रुपयांच्या निधीला कालच प्रशासकीय मान्यता दिली होती. तर आज त्यांनी मनपा हद्दवाढीसाठी आज बैठक लावली आहे.
0 comments:
Post a Comment