Ads

बीएस इस्पातचा शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न

चंद्रपुर :-वरोरा तालुक्यातील मजरा येथील बिएस इस्पात कंपनी स्थानिकांना आणि कामगारांना न्याय देण्यास असमर्थ ठरल्या नंतर झालेल्या आंदोलनामुळे काही वर्षे ही कंपनी बंद होती. कंपनी पुन्हा सुरू झाल्या नंतर पूर्वीप्रमाणेच स्थानिक बेरोजगारांना काम द्यावे, तसेच प्रदूषण नियंत्रित करावे, प्रदूषणामुळे फटका बसणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, पांदन रस्ते तयार करावे, ग्रामपंचायतींचा थकीत कर भरावा यासह अन्य मागण्या घेऊन शिवसेनेच्या नेतृत्वात स्थानिक ग्रामस्थांनी आंदोलन पुकारले.
या आंदोलनाला चार महिने पूर्ण होत आहे.कंपनी व्यवस्थापनाची उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात शिवसेना पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्यात बैठक झाली. ग्रामस्थांच्या मागण्या 30 मे पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले गेले. परंतु आंदोलन मागे घेताच कंपनी अधिकाऱ्यांनी दिलेला शब्द फिरवला. यामुळे शिवसेनेच्या नेतृत्वात ग्रामस्थांचे आंदोलन पुन्हा सुरू झाले.यामुळेच कंपनी व्यवस्थापन त्रस्त झाले.आणि त्यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख जिवतोडे व युवानेते मनीष जेठाणी यांच्या विरुद्ध खोटी तक्रार करून शिवसेनेला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले आहे.अशी माहीती खुद्द मनीष जेठाणी यांनी शनिवारी 28 मे ला पत्रपरिषदेत दिली.
यावेळी ऍड.अमोल बावणे,शहर प्रमुख संदीप मेश्राम,सरपंच(मजरा)वंदना निब्रड,ग्रा.सदस्य प्रतिभा मानकर यांची उपस्थिती होती.

*बीएस इस्पातने असे रचले षडयंत्र*
ग्रामपंचायत सदस्य हर्षद निब्रड यांच्या सोबत कम्पनीच्या अधिकाऱ्यासोबत संभाषणाची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली. त्या क्लिपच्या आधारे वरोरा पोलिसात तक्रार देऊन बीएस इस्पातने ,हर्षद निब्रड यांनी आंदोलन मागे घेण्यासाठी पैसे व कंत्राट तर शिवसेनेचे मनिष जेठाणी यांनी कंत्राट मागितल्याचा आरोप केला.सदर ऑडिओ क्लिप मध्ये मनीष जेठणी यांनी कसल्याही प्रकारची मागणी केली नसल्याचे ऑडिओ क्लिप मधून स्पष्ट झाले. असे असताना पोलिसात तक्रार देणे व ऑडिओ क्लिप व्हायरल करणे म्हणजे शिवसेनेला बदनाम करून मनीष जेठाणी यांना सामाजिक व राजकीय जीवनातून उठविण्याचे हे षडयंत्रच होय,असेही जेठाणी म्हणाले.

गावकऱ्यांच्या तक्रारीची दखल
बीएस इस्पातच्या षडयंत्राविरोधात तीनशेपेक्षा अधिक ग्रामस्थांनी एक वेगळी तक्रार पोलिसात देऊन बदनामी करणाऱ्या सर्वांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. दरम्यान कंपनी व्यवस्थापन, शिवसेना पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांच्यात समेट घडविण्याचा आणि यांच्यातील वाद संपुष्टात आणण्याचा प्रयत्न वरोरा उपविभागीय पोलिस अधिकारी आयुष नोपाणी यांनी दिनांक 26 मे रोजी त्यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत केला. या बैठकीला पोलिस निरीक्षक दीपक खोब्रागडे उपस्थित होते. चर्चेअंती 120 स्थानिक बेरोजगारांना टप्प्या टप्प्याने कंपनीत सामावून घेण्याचा निर्णय झाला. तसेच मनीष जेठाणी आणि ग्रामस्थांनी दिलेल्या तक्रारीची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन पोलिस अधिकाऱ्यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार शनिवार २८ मे रोजी बी एस इस्पात कंपनीचे मनीष कातंगडे, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, आणि मनसेचे तालुकाध्यक्ष वैभव डाहाणे यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशी माहीती मनीष जेठाणी यांनी दिली.

पुन्हा खोटे आरोप व बदनामी
उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत कोणत्याही प्रकारची धमकी शिवसेनेचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष मुकेश जीवतोडे आणि युवा सेनेचे जिल्हा सरचिटणीस मनीष जेठाणी यांनी दिली नसताना 27 में रोजी बीएस इस्पात कंपनीचे एच आर प्रमुख मनीष कातंगडे यांनी पुन्हा पोलिसात तक्रार देऊन धमकी दिल्याचा खोटा आरोप केला.यासंदर्भात आपण पुन्हा पोलिसात तक्रार करून बदनामी करणाऱ्या इतरांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे युवा सेनेचे जिल्हा चिटणीस मनीष जेठाणी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.यासर्व घटनाक्रमामागे भद्रावती येथील एका नेत्याचा हात असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment