Ads

अपघातग्रस्त सफाईकर्मीला काँग्रेस तर्फे आर्थिक मदद

घुग्घुस :-अपघातग्रस्त सफाईकर्मीला काँग्रेस तर्फे आर्थिक मदद राजूरेड्डी यांनी घडविले माणूसकीचे दर्शन येथील तिलक नगर निवासी अशोक कामपल्ली वय - 30 वर्ष हे नगर परिषदेत कंत्राटी पद्धतीने सफाईकर्मी म्हणुन कार्यरत आहे.
गेल्या चार - पाच दिवसांपूर्वी राजीव रतन चौक कडून सायकलने जात असता ट्रक खाली येवून अपघात घडला या अपघातात कांमपेल्ली यांचा एका पायाचा पूर्ण चुराडाच झाला
अपघातग्रस्त सफाईकर्मीला तातडीने सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे भरती केले मात्र रुग्णाची परिस्तिथी अत्यंत गंभीर असल्याने ट्रक मालकाने रुग्णाला डॉ. चेपुरकर यांच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले.
रुग्ण हा सिकलसेल रुग्ण असल्याने त्यांच्या शरीरात रक्ताचा तूटवडा झाल्याने त्याला अती दक्षता विभागात ठेवण्यात आले.
गेल्या तीन चार दिवसात जवळपास एक लाख रुपये खर्च झाल्याने यापुढे आपण आर्थिक मदद देवु शकत नसल्याचे ट्रक मालकाने सांगितल्यावर कामपेल्ली कुटुंब संकटात सापडला.

सदर माहिती मिळताच राजुरेड्डी यांनी रुग्णालयात जावून रुग्णाची भेट घेतली व डॉक्टर कडून पूर्ण अंदाजित खर्चाचा आढावा घेतला असता दोन ते तीन लाख रुपये खर्च येणार असल्याचे माहिती मिळाली सदर कुटुंब अगदी गरीब असल्याने घरात खायलाच नाही तर उपचार कसा करायचा असा प्रश्न कांमपेल्ली यांच्या पत्नीला पडला असता काँग्रेस अध्यक्षाने कुटुंबाच्या सहमतीने सदर रुग्णाला दत्ता मेघे वर्धा येथे हलविण्याचा निर्णय घेतला चेपुरवार रुग्णालयाचे उपचार खर्च फेडून रुग्णवाहिका बोलवून रुग्णाच्या पत्नीला वीस हजार रुपये आर्थिक मदद दिली.

रेड्डी यांच्या सहयोगाने पीडित कुटुंबाच्या डोळ्यात अश्रू तरांगले आपल्या मददतीला देवदूतच धावून आल्याचे समाधान कामपेल्ली कुटुंबाने व्यक्त केले.
याप्रसंगी कामगार नेते सैय्यद अनवर व बालकिशन कुळसंगे उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment