भद्रावती तालुका प्रतिनिधी :-शहरातील कायदा व सुव्यवस्था जागृकता दाखवीत करीत असलेल्या चौक कर्तव्यदक्ष पना बद्दल शहरातील जामा मस्जिद कमेटीतर्फे दिनांक 4 मे रोज बुधवारला भद्रावती पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक गोपाल भारती तथा सर्व पोलीस कर्मचाऱ्याचे अभिनंदन करीत त्यांचे श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी जामा मज्जित कमिटीचे अध्यक्ष हाजी बबन सेठ, व नगरसेवक हाजी जावेद शेख, हाजी अब्बास भाई ,नाजिम शेख, समीर शेख, सहेरिश शेख आर्किटेक, हसन शेख, व जावेद शेख पत्रकार ,फय्याज शेख,आदींची उपस्थिती होती यावेळी जामा मस्जिद कमिटीकडून सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या शीरखुर्मा तथा अल्पोपहार देण्यात आला गोपाल भारती हे ठाणेदार पदावर रुजू झाल्यापासून शहरातील कायदा व सुव्यवस्था संदर्भात चांगलीच सुधारणा झालेली आहे. शहरातीसार्वजनिक ठिकाणी तथा रात्र ला शहरात पोलीस प्रशासनातर्फे नियमित पेट्रोलिंग करण्यात येते असल्यामुळे शहरातील असामाजिक तत्त्वावर चांगलाच वचक बसलेला आहे त्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था कमालीची सुधारणा झालेली आहे सणासुदीला दिवसातही भद्रावती पोलीस प्रशासनातर्फे दक्षता घेण्यात येत असल्याने सामाजिक तथा धार्मिक कार्यक्रम शांततेत व उत्साहात पार पडत आहे
0 comments:
Post a Comment