ब्रह्मपुरी (सुभाष माहोरे ) :-" अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे मराठी माणसांठी सांस्कृतिक, साहित्यिक, वैचारिक मेजवानीच असते.एकतर त्याचे भव्यदिव्य स्वरुप.राजकारणी, समाजकारणी आणि साहित्यिक याप्रसंगी एकञ येतात.अनेक विषयावरचे परिसंवाद, कविसंमेलने, मुलाखती, कलादालन आणि माध्यमांची रेलचेल यामुळे संमेलनाला याञेचे रुप येते.उदगीरच्या कविसंमेलनात मी निमंत्रित कवी होतो.एक कविता गाऊन दाखविली.श्रोत्यांचा प्रतिसाद लाख मोलाचा होता.माध्यमावरिल परिसंवाद, स्वातंञ्याचा अमृत महोत्सव, शेतक-यांच्या साहित्यावरील परिसंवाद,कादंबरीकार डॉ राजन गवसांची मुलाखत, गझलकट्टा ही सारी कार्यक्रम म्हणजे अनुभूतीचा मर्मबंधी ठेवा होय " असे अनुभवकथन प्रसिध्द कवी डॉ धनराज खानोरकरांनी मराठी वाडःमयाच्या विद्यार्थ्यांसमोर मांडले.
ते नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात मराठी साहित्यांच्या विद्यार्थ्यांसमोर नुकतेच उदगीर येथे पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची अनुभूती मांडीत होते.डाॅ युवराज मेश्रामांनी व विद्यार्थ्यांनी त्यांना विविध प्रश्न विचारुन बोलते केले.कार्यक्रम प्राचार्य डॉ एन एस कोकोडेंच्या मार्गदर्शनात पार पडला.
संचालन कु मेहर व आभार कु.राऊतने केले.कार्यक्रमासाठी बी ए द्वितियच्या विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले
0 comments:
Post a Comment