Ads

सिरोंचा येथे नव्या राष्ट्रीयकृत बंँकेची शाखा उघडण्याबाबत केंद्रीयमंञ्याना निवेदन..

चंद्रपूर:- सिरोंचा येथे नव्या राष्ट्रीयकृत बंँकेची शाखा उघडण्याची मागणी भाजयुमो चंद्रपूर महानगर
जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेश कोलावार यांनी भारत सरकारचे केंद्रीय अर्थ राज्यमंञी डाॅ.भागवत कराड यांच्याकडे केली आहे.याबाबतचे निवेदन त्यांना सादर करण्यात आले.
गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा हे शहर जिल्हा मुख्यालयापासून २१२ कि.मी च्या अंतरावर वसलेले आहे.सिरोंचा तालुक्यात जवळपास १४० च्या वर गावांचा समावेश असून शहरात एकच राष्ट्रीयकृत बँक (बँक आॅफ इंडिया) नागरिकांच्या सेवेत आहे.या बँकेत दिवसभर तालुका व शहरातील नागरिकांची प्रचंड गर्दी असते.त्यातही या बँकेचा एटी.एम जास्त प्रमाणात बंद अवस्थेतच असल्यामुळे अनेकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.

शहरातील एकमेव राष्ट्रीयकृत बँक सोडले तर सिरोंचापासून ११० कि.मी च्या अंतरावर असलेल्या अहेरी याठिकाणी आहे.मागील काही वर्षापासून अहेरी येथील राष्ट्रीयकृत बँक असलेल्या एस.बी.आय शाखेमार्फत सिरोंचा येथे ग्राहक सुविधा केंद्र सुरु केले असून ५०० च्या वर खातेदार आहेत.शहरातील व तालुक्यातील नागरिकांच्या अपेक्षेप्रमाणे व
तसेच सिरोंचावासी नवीनकुमार जन्नमवार यांचे सूचनार्थ सिरोंचा येथे नवीन १ ते २ राष्ट्रीयकृत बँक सुरु करण्याची मागणी केली जात आहे. या मागणीच्या अनुषंगाने भाजयुमो चंद्रपूर महानगर जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेश कोलावार यांनी पुढाकार घेऊन याबाबतचे निवेदन भारत सरकारचे केंद्रीय अर्थ राज्यमंञी डाॅ.भागवत कराड यांना सादर करुन वरील बाबीकडे विशेष लक्ष देण्याची विनंती केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment