भद्रावती तालुका प्रतिनिधी:-पिपरी देशमुख येथे अस्थी विसर्जनासाठी आलेले डोलारा चंडिका वार्ड भद्रावती येथील दिलीप मारोती रणदिवे वय 50 वर्षे याचा खोल पाण्यात बुडून मृत्यु झाला.Men dies after drowning in Wardha river ghat.
सदर मृत्यु ची बातमी नगरसेवक राहुल सोनटक्के यांनी भद्रावती पोलीस ठाण्यात दिली. व चंद्रपूर येथील रेस्क्यू पथकयांनी मृतकाला एक तासाच्या शोध कार्या नंतर बाहेर काढले.
पोलीस काँ.मनोहर नांदे व पोलीस बेझलवार ,पोलीस पाटील सुनिता ठोंबरे यांनी पंचनामा केला.
बोटचालक अशोक गर्गेलवार,दिलीप चव्हाण, अतुल चहारे,उमेश बनकर, मंगेश मते, वामन नक्षीणे,सुजीत मोगरे, गीरीश मरापे,अजीत बाटे.यांनी सहकार्य केले.
0 comments:
Post a Comment