Ads

डॉक्टरांच्या निष्काळजीमुळे 2 वर्षीय बालकाचा महिला रुग्णालयात मृत्यु ; डॉक्टरवर गुन्हा दाखल करुन निलबिंत करा- पालकांची मागणी

सावली प्रतिनिधी :-डॉक्टरांच्या निष्काळजीमुळे एका २ वर्षीय बालकाचा गडचिरोलीच्या महीला रूग्णालयात मृत्यू झाल्यामुळे या डॉक्टरवर गुन्हा दाखल करून निलंबीत करावे अशी मागणी मृतकाचे पालक आशिष प्रधाने, आजोबा भंजदेव यांनी केली आहे. 2-year-old girl dies in hospital due to doctor's negligence
चंद्रपूर जिल्हयातील सावली येथिल पार्थ आशिष प्रधाने या २ वर्षीय बालकाला त्याच्या कुटुंबीयांनी पहाटे ४.०० वाजता उपचारासाठी गडचिरोली येथिल महिला रूग्णालयात दाखल केले. परंतु यावेळी एकही डॉक्टर हजर नव्हते. डॉक्टर तारकेश्वर उईके यांची नेमणूक असतांना ते ड्युटीवर हजर नव्हते. वारंवार फोन करूनही डॉक्टर आले नाही.
डॉक्टर उईके आज सकाळी ७. ४५ वाजता आले. तोपर्यंत बालकाचा मृत्यू झाला. या प्रकरणात मृतकांच्या कुटुंबीयांनी जिल्हा शल्य चिकित्सक व पोलीस स्टेशन गडचिरोली येथे तक्रार नोंदविली त्यानूसार चौकशी सुरू केली व मृतकाचे शव पोस्टमार्टमसाठी पाठविले.
सदर प्रकरणाबाबत खासदार अशोक नेते यांना माहिती देण्यात आली. त्यांनी तात्काळ महिला रुग्णालय गाठून रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले. वेळीच संबधित डॉक्टर यांचेवर कारवाई करावी असे आदेश रुग्णालय प्रशासनाला दिले. भविष्यात अशा घटनांना आळा बसावा असे निर्देशित केले. यावेळी चिमूर तालुका अध्यक्ष डॉ श्याम हटवादे , सावली तालुका अध्यक्ष अविनाश पाल, सावली तालुका महामंत्री सतीश बोम्मावार, निखिल सुरमवार, अम्रोजवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment