Ads

पुरात अडकली बस, पोलीस आणि ग्रामस्थांनी वाचविले ३५ प्रवाशांचे प्राण

धोकादायक नदी नाल्यांच्या परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून त्या ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली आहे

राजुरा तालुक्यातील चिंचोली येथील नाल्याच्या पुरात एक खासगी प्रवासी बस अडकल्याने तब्बल ३५ प्रवाशांचा जीव धोक्यात आला

चंद्रपूर : सलग चार दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी पूर आला असून कित्येक भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच, राजुरा तालुक्यातील चिंचोली येथील नाल्याच्या पुरात एक खासगी प्रवासी बस अडकल्याने तब्बल ३५ प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. मात्र, पोलीस आणि ग्रामस्थांनी या प्रवाशांना वाचवले.  35 passengers were in danger as the bus got stuck in Flood
पावसामुळे उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेता,प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या असून पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. धोकादायक नदी नाल्यांच्या परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून त्या ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातून हैद्राबादला जाणारी एक खासगी बस जवळचा मार्ग म्हणून राजुरा तालुक्यातील चिंचोली मार्गे जात होती. दरम्यान, रस्त्यातील नाल्याला जास्त पाणी असल्याने त्या मार्गाने बस नेऊ नये, अशी सूचना पोलिसांनी चालकला दिली होती. मात्र, पोलिसांच्या सूचनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून चालकाने त्याच मार्गाने बस पुढे नेली. पहाटे पाच वाजताच्या सुमारास चालकाला चिंचोलीजवळील नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बस पुरात ओढल्या गेली व बंद पडली. ह्यामुळे बसमधील प्रवाशांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. पुरात खासगी प्रवासी बस अडकल्याचे समजताच गावकऱ्यांनी विरूर पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी तत्काळ धाव घेत गावकऱ्यांच्या मदतीने बसमधील ३५ प्रवाशांची सुरक्षित सुटका केली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment