Ads

पुरग्रस्तांसाठी पुढे सरसावले झाडीपट्टीतील कलाकार

चंद्रपूर :-हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे, माणसाने माणसांशी माणसासम वागणे.....अशी प्रार्थना आपण हल्ली अनेकांच्या मुखातून ऐकत असतो. पण यासम कृती करणाऱ्यांची संख्या फार कमी. ते करण्यासाठी मन संवेदनशील असणं महत्वाचं असतं. असाच संवेदनशीलपणा झाडीपट्टीतील कलाकारांचा समोर आला असून हे कलावंत आता 'महाराष्ट्राची आण बाण शान असणाऱ्या लावणीचा प्रयोग करून चंद्रपूर जिल्ह्यातील पुरग्रस्तांसाठी निधी संकलित करणार आहेत. त्यामुळे या संवेदनशील कलावंतांची चर्चा महानगरात होत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने थैमान घातल्यावर विदर्भ सर्वाधिक प्रभावित झाला.त्यातही चंद्रपूर जिल्ह्याची स्थिती भयावह आहे.अजूनही पावसाने उसंत घेतली नाही. अतिवृष्टीसह धरणाच्या पाण्याने कहर केल्याने.अनेक गावांना 3 वेळा पुराचा सामना करावा लागला. 5156 घरं पडली, 97 झोपड्या नष्ट झाल्या तर 257 गोठे बाधित झाले. 26 मोठी दुधावळ, 35 लहान दुधावळ तर 38 ओढकम करणारी जनावरं मृत पावली. यांच्या पाठोपाठ 15 व्यक्तींना जीव गमवावा लागला व 12 लोक जखमी झाले. अतिवृष्टीमुळे 1934 कुटुंब तात्पुरत्या स्वरूपात निराधार झाले. त्यामुळे 7604 बाधित व्यक्तींना स्थलांतर करावे लागले. याची दखल घेत शक्य ती मदत करण्याचा संकल्प करुणाई बहुउद्देशीय संस्थेने व झॉलिवूड फेम निशा धोंगडे यांनी घेतला. पण करावे काय. ? कुणाला पैसे मागावे हा प्रश्न उभा राहिला. त्यांनी कलावंतांना आवाहन केले. आणि कलेच्या बळावर निधी गोळा करण्याचे ठरले.या उपक्रमात आता झाडीपट्टीतील कलावंत निशा शीतलकुमार धोंगडे यांचेसह पूजा पिंपळकर, ज्योती रामावार, कीर्ती मरसकोल्हे, शिल्पा शाहीर नागपूर, सपना आवळे, दीप्ती गोडघाटे, निकिता गोडघाटे, रवी दुर्गे, प्रफुल नागपुरे, संतोष मशाखेत्री, ओमकार आशिष अवचार, ओमकार भसारकर हेही सहभागी झाले आहेत. पूरग्रस्तांच्या मदतीला धावून या असे आवाहन निशा धोंगडे यांनी केले आहे.
कार्यक्रमाचे आकर्षण
झाडीपट्टीच्या कलाकारांनी लावणीचा प्रयोग करीत असताना लोकांना आकर्षित करण्यासाठी, घुंगराचा तोडा, सवाल जवाब लावणी, बैठक लावणी, जुगलबंदी, बॉलीवूड तडका एकल लावणी प्रस्तुत करण्याचा निर्णय घेतलेला आहे. विविध प्रकारच्या लावणीचा आनंद घेण्याची ही पहिलीच संधी ठरणार आहे. येत्या 07 ऑगस्टला प्रियदर्शिनी सांस्कृतिक सभागृहात सायंकाळी 6.30 ते 10च्या दरम्यान लावणीचा हा प्रयोग होणार आहे
.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment