Ads

जय हरी विठ्ठल च्या जयघोषात भद्रावती दुमदुमली

भद्रावती तालुका प्रतिनिधी :-आषाढी एकादशी महोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या विठ्ठल रखुमाई पालखीच्या शोभायात्रेतील जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा माऊली तुकाराम च्या जयघोषाने भद्रावती दुमदुमली.
श्री विठ्ठल मंदिर देवस्थान कमिटी किल्ला वॉर्ड भद्रावती तर्फे आषाढी एकादशी महोत्सवानिमित्त सोमवारी विठ्ठल रखुमाईची शोभायात्रा काढण्यात आली.
शोभायात्रेचे उद्घाटन नगराध्यक्ष अनिल धानोरकर व ठाणेदार गोपाल भारती यांचे हस्ते करण्यात आले .याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते बळवंतदादा गुंडावार, मनोहरराव पारधे तसेच कमिटीचे चंद्रकांत गुंडावार सुरेश परसावार,अशोक उपलांचीवार, राजेश्वर मामीडवार , समीर उपलांची वार ,विशाल गावंडे, गोपाल ठेंगणे ,उल्हास भास्करवार, अविनाश पामपट्टीवार, भोपे महाराज उपस्थित होते.

विठ्ठल मंदिर, भोजवार्ड,जंगल नाका ,जुना बस स्टॅन्ड ते विठ्ठल मंदिर पर्यंत शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. या शोभायात्रेत लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय भद्रावतीच्या च्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता.

शोभायात्रेत सर्वप्रथम घोष पथक ,लेझीम पथक, पा पाऊले पथक, झेंडा पथक, तसेच विठ्ठल रुक्मिणी ,संत ज्ञानेश्वर व संत तुकारामाच्या झाक्या तसेच विठ्ठल रखुमाई ची पालखी लक्ष वेधून घेत होती. शोभायात्रेदरम्यान ठीक ठिकाणी विठ्ठल रखुमाईची लोकांनी पूजाअर्चा केली. या प्रसंगामुळे भद्रावतीतच पंढरपूर अवतरल्याच्या भावना निर्माण झाल्या होत्या. शोभा यात्रेत प्रियदर्शनी आयटीआय च्या विद्यार्थ्यांचाही समावेश होता.
रविवारी विठ्ठल रखुमाई मूर्तीची महापूजा व अभिषेक करण्यात आला .रात्री राष्ट्रीय कीर्तनकार शाम धुमकेकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यांना साथ सरपटवार परिवार व संच, भद्रावती यांची लाभली. शोभायात्रेत बारा भजन मंडळी सहभाग घेतला होता. शोभायात्रेनंतर कीर्तन व गोपाल काला तसेच महाप्रसादाने संपूर्ण कार्यक्रमाची सांगता झाली. याप्रसंगी प्राचार्य आशालता सोनटक्के, सचिन सरपटवार, पर्यवेक्षक रूपचंद धारणे ,मधुकर सावनकर, लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच असंख्य भद्रावतीकर उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment