Ads

पोलीस स्टेशन रामनगर येथील डिबीपथकाने घरफोडी करणा-या चोरट्यांना ठोकल्या बेड्या

चंद्रपुर :- शहरातील पूर परिस्थितीचा गैरफायदा घेत घरफोडी करून चोरी करणाऱ्या चोरट्यांना burglars रामनगर पोलिसांनी अटक केली आहे, यात 7 चोरट्यांना अटक करून लाखोंचा ऐवज रामनगर पोलिसांनी हस्तगत केला आहे.
शहरातील शामनगर, बंगाली कॅम्प येथील डॉ. निखिल बिश्वास बाहेरगावी गेले असता 8 में 2022 रोजी त्यांचा घराचा मागचा दरवाजा तोडून 1 लाख 91 हजाराचा माल चोरला गेला तर शामनगर येथील सुभाष दासरपू त्यांचे घरी 23 जून 2022 रोजी बाहेरगावी गेले असता यांचे घरून लॅपटॉप व दागिने असा 1 लाख 16 हजारांचा माल चोरी झाल्याची तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली. Ramnagar police station रामनगर पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपासात घेतला

गेल्या नंतर नमुद दोन्ही गुन्हयांचे गांभीर्य बघता पोस्टे रामनगर ठाणेदार पो. नि. राजेश मुळे, गुन्हे शोध पथकातील सपोनि हर्बल अकरे, पोउपनि विनोद भुरले व डि.वी. स्टॉफ यांनी गुन्हयांचे घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सी. सी. टि.व्ही. फुटेज व गोपनीय बातमिदार यांना वारंवार भेट देवुन गुन्हयातील अज्ञात आरोपीतांचा शोध घेणे कामी अतीशय परिश्रम घेवुन गुन्हे उघडकीस आणले यात 7 आरोपी व एक विधिसंघर्ष बालकास अटक करण्यात आली.

आरोपी मनि कालीपत विश्वास, वय ४० वर्ष, रा. शामनगर, भगतसिंग चौक, चंद्रपुर, सुमन दिलीप डकुआ, वय ३० वर्ष, रा. भारत चौक, क्रिष्णानगर, मुल रोड, चंद्रपुर, पिंकु नरेंद्र मिस्त्री, वय ४० वर्ष, रा. अरुणनगर ता. अर्जुनी, जि. गोंदिया व समीर मुनिर पठाण वय 20 वर्ष रा. शामनगर, शुभम रामटेके, शामनगर, चंद्रपुर, करण ओमप्रकाश टडन, वय २१ वर्ष, रा. महाविर नगर, चंद्रपुर, उमाकांत उदासीन, रा. जलनगर, चंद्रपुर व एक विधीसंघर्ष बालक चंद्रपुर यांना ताब्यात घेतले असून दोन्ही गुन्ह्यातील मुद्देमाल एक नग सोन्यचे मोठे नेकलेस, एक सोन्याची गोफ, एक नग बांगळीचे वर लावलेला सोन्याचे पातळ कडा, दोन सोन्याचे लहान नेकलेस, एक नग मोठी सोन्याची अंगुठी, दोन नग लहान मुलांची सोन्याची अंगुठी, एक नग सोन्याची मुंदी, मुर्तीचे मंगलसुत्र वजन ४ ग्रॅम, सोन्याचे नेकलेस, सोन्याचे डोरले, सोन्याची चैन, एलईडी टिव्ही सेट टॉप बॉक्स, डेल कंपनी चा मॉनिटर एका गुन्ह्यातील तर एक सोन्याचे मंगलसूत्र काळया मण्यासह, एक सोन्याचे नेकलेस, एक सोन्याचे डोरले, एक सोन्याची असा एकुण 3,28000 रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, उपविभागिय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांचे मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस निरीक्षक राजेश मुळे, सपोनि हर्षल एकरे, पोउपनि विनोद भुरले, पो. हवा. रजनीकांत पुट्ठावार, पेतरस सिडाम, मरकोल्हे, विनोद यादव, किशारे वैरागडे, पुरुषोत्तम चिकाटे, आनंद खरात, निलेश मुडे, पांडुरंग वाघमोडे, सतिश अवधरे, लालु यादव, विकास जुमनाके, हिरालाल गुप्ता, संदिप कामडी, सुजीत शेंडे, विकास जाधव, भावना रामटेके यांनी केली आहे.

पॉलीस स्टेशन रामनगर हद्दीत तसेच चंद्रपुर शहरात मागील १५ दिवसापासून सतत पाउस चालु असुन पावसामुळे रहमदनगर, सिस्टर कॉलनी, जगनाथबाबा नगर या परिसरामध्ये पुर परिस्थीती निर्माण झाल्याने लोक आपले घर सोडुन निघुन गेले त्या दरम्यान पुराचा फायदा घेवून भुरट्या चोरानी लोकांचे घर उघडे असल्याचा पाहून मोठ्या प्रमाणे चो-या केल्याचे तकारी पोस्टेला प्राप्त झाले वरून खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आणुन आरोपी अटक करून माल जप्त केला असल्याने शहरातील नागरिक कारवाई ची प्रशंसा करीत आहेत.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment