राजुरा प्रतिनिधी :-राजुरा पोलिसांनी धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणावर अवैधघातक शस्त्रसाठा जप्त केल्याने खळबळ उडाली आहे.
Rajura police arrested 3 accused who were carrying illegal weapons
Rajura police arrested 3 accused who were carrying illegal weaponsप्राप्त माहितीनुसार 25 जुलै रोजी सकाळी गस्तीवर असलेल्या पोलीस चमूला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार शहरातील सोमनाथ पूर वॉर्ड येथील तिघांनी बिहार राज्यातून घातक शस्त्र आणले असुन भविष्यात काहीतरी मोठी घटना घडण्याची शक्यता आहे.
गस्ती पथकाने मिळालेली माहिती तात्काळ वरिष्ठांना कळवली त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी ह्यांच्या कुशल मार्गदर्शनात ठाणेदार बहादुरे ह्यांच्या अचुक नियोजनात सहा. पोलीस निरीक्षक एस व्हि दरेकर ह्यांच्या नेतृत्वात पोउनि हिराचंद गव्हारे, नापोशी नागोराव भेंडेकर, नापोशी संदीप बुरडकर, पोशी रामा भिंगेवाड ह्यांच्या चमूने चातुर्याने संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने त्यांच्याकडे 1 पिस्तौल, 2 देशिकट्टे, स्टील तलवार तसेच चक्र असलले 1 घातक शस्त्र या कबूल केले. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस चमूने लावजोत सिंग हरदेव सिंग देवल वय 18+ यांच्यासह विधिसंघर्ष बालकाला अपराध क्र. 304/22 अंतर्गत आर्म ऍक्टच्या कलम 3, 4, 25 अन्वये गुन्ह्याची नोंद करून आरोपींना अटक करण्यात आली.
0 comments:
Post a Comment