Ads

चीचपली वन परिक्षेत्रातील वन सुरक्षा कुंपनाचे कामात गैरव्यवहार

चंद्रपुर:- चीचपल्ली वन परिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या चीचपली, केळझर आदी उपवनपरिक्षेत्रातील गावातील वनात वृक्षारोपण करण्यात येत असून गुरांपासून वणाचे सौरक्षान वावे या उदांत हेतूने वनाला सुरक्षा कुंपण लावण्यात येत आहे. त्यात अनेक त्रुटी दिसून येत असून कामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याचे समजते.
केळझर उपवन परिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या सुशी, दाबगावं मक्त, केलझर आदी गावाला व परिसराला लागून झुडपी जंगल असून काही दिवसापूर्वी वन विभागाने सादर वन साफ करून त्या जागी नवीन वन रोपण करणार आहे. त्यामुळे सदर वृक्षांची नासधूस होऊ नये व वणासाह वन्य प्राण्यांची जोपासना व्हावी या हेतूेने वन विभागामार्फत सदर वनाला सुरक्षा कुंपण लावण्याचे काम मंजूर करून कंत्राटदारामार्फत कामाला गती देण्यात आलेली आहे. मात्र सदर कामात अनेक त्रुटी असून कामात खोदकामासह कुंपण करिता वापरण्यात येणारे सिमेंट पोल व साहित्य अतिशय निकृष्ट दर्जाचे असून अल्पावधीतच व वन्यप्राण्यांच्या हुंडक्याने किंवा गुरा ढोराणे अल्पावधीतच पोल तुटून खाली पडण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचे नागरिकात बोलल्या जात आहे. Malpractices in the work of the forest security fence in Cheechpali forest zonech

काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या तोंडी सूचनेवरून खुद वन अधिकारी यांनी सदर कामावर हजेरी लावली असता पोल निकृष्ट दर्जाचे आढळून आल्याचे समजत असून काम बंद ठेवण्याचा सूचना कंत्राट दारास दिल्याचेही वृत्त आहे. मात्र अल्पावधीतच कंत्राटदारांनी कामाला गती देत वन अधिकारी समक्ष निकृष्ट पोल काढल्याचे दाखवून जुन्याच निकृष्टदर्जाचे पोलनेच काम पूर्ण केल्याचे आरोप नागरिकात केल्या जात आहे एवढेच नाही. तर उन्हाळ्यात अकाली पाणी आल्याने अनेक दिवसापूर्वी खोदण्यात आलेल्या खड्यात बाजुचीच माती जाऊन खडे बुजल्याने त्याच खाद्यात सिमेंट व गिटी, रेती आदीचा वापर कमी करून काम पूर्ण केले आहे. तसेच उन्हाळा तपता असताना झालेल्या कामावर पाण्याचा वापर सुद्धा कमी केले आहे. एकंदरीत काम अतिशय निकृष्टदर्जाचे झाले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करून कंत्राटदार व अभियंता यांचेवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.

सदर काम हे वनविभागाच्या संबंधित अभियंता यांच्या देखरेखीत न होता स्वतः कंत्राटदार यांनीच कामाला पूर्ण केले असल्याने अभियंता व वन अधिकारी यांच्या कर्याप्रती नागरिकात संशय निर्माण झालेला आहे.
वन विभागात काही मोजकेच व नेहमीचेच कंत्राटदार असल्याने कामाची निविदा होऊन सुद्धा काही निवडक कंत्राट दारणाच कामे मिळत असल्याने नागरिकात मोठा संभ्रम सुद्धा निर्माण झालेला असल्याने वन विभागाचे अधिकारी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करणार काय ? याकडे नागरिकांचे लक्ष लागले असून कार्यवाहीची मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment